advertisement

पुढील 3 दिवस पावसाचे, पुण्यात मात्र उष्णतेचा कहर, पाहा कसं असेल राज्यातील हवामान

Last Updated:

विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील इतर शहरांमध्ये मात्र उष्णता कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

+
News18

News18

मुंबई : राज्यामध्ये 19, 20 आणि 21 मार्च रोजी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील इतर शहरांमध्ये मात्र उष्णता कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यातील काही शहरांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस ढगाळ हवामान राहण्याची देखील शक्यता आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.
मुंबई शहर आणि उपनगरातील कमाल तापमानात घट झाली असली तरी किमान तापमान मात्र लक्षणीयरीत्या वाढले आहे. मुंबईमध्ये 19 मार्च रोजी सामान्यतः ढगाळ आकाश राहील तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढे असेल. पुण्यामध्ये मात्र उष्णतेचा कडाका कायम आहे. पुण्यात कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे. तर कोल्हापूरमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असून कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
advertisement
मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसभर उन्हाचा कडाका जाणवणार असून सायंकाळच्या वेळी आकाश भरून येऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. संभाजीनगरमध्ये 19 मार्च रोजी कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे. उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे. नाशिकमध्ये ढगाळ आकाशासह कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये सर्वाधिक कमाल तापमान उपराजधानी नागपूरमध्ये राहण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये ढगाळ आकाशासह कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढे असेल.
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुढील 3 दिवस पावसाचे, पुण्यात मात्र उष्णतेचा कहर, पाहा कसं असेल राज्यातील हवामान
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement