Pune Success Story : महिन्याला अडीच लाख रुपये पगाराची नोकरी सोडली, सुरू केला स्वतःचा व्यवसाय, आज कोटीत उलाढाल!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
कोरोना काळात मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे परिसरातील भाऊसाहेब यांनी वयाच्या पन्नास व्या वर्षी परदेशातील लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून नर्सरी च्या व्यवसायाला सुरुवात केली.आज ते या व्यवसायातून वर्षाकाठी जवळपास दोन कोटींची उलाढाल करत आहेत.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : तुमच्यामध्ये आयुष्यातील आपले स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही, याची तुम्ही अनेक उदाहरणे पाहिली असतील. आज अशाच एका व्यक्तीची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत. पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील रहिवासी भाऊसाहेब नवले यांनी महिन्याला अडीच लाख रुपयांची चांगली पगाराची नोकरी होती. ती सोडून त्यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात ग्रीन अँड ब्लूम्स नावाने नर्सरी सुरू केली. या माध्यमातून आज ते कोट्यवधी रुपयांची उलाढाल करीत आहेत.
advertisement
कोरोना काळात मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे परिसरातील भाऊसाहेब यांनी वयाच्या 50 व्या वर्षी परदेशातील लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून नर्सरीच्या व्यवसायाला सुरुवात केली. आज ते या व्यवसायातून वर्षाकाठी जवळपास दोन कोटींची उलाढाल करत आहेत. वयाच्या 50 व्या वर्षी जबाबदारी पेलून नवले यांनी हे यश मिळवलं आहे. त्यांची ही यशोगाथा शेतकऱ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
advertisement
भाऊसाहेब नवले हे बीएस्सी ऍग्री झालेले आहेत. शिक्षणानंतर त्यांनी जवळपास 25 वर्ष नोकरी केली. इथोपिया या देशात ते महिना अडीच लाख रुपये पगाराची नोकरी केली. पण मनात आपल्या देशात राहुन काय करता येईल, असा विचार त्यांना नेहमी सतावत होता. अखेर त्यांनी 25 वर्षांच्या नोकरीला सोडून मावळ तालुक्यात ग्रीन ऍण्ड ब्लुम्स नर्सरी सुरू केली.
advertisement
यातील 10 वर्षे इथोपिया देशात पॉलिहाऊस मधील गुलाब उत्पादनाचा अनुभव देखील घेतला आहे. मात्र, तिथून पुन्हा मायदेशात परतले आणि नर्सरीत नोकरी केली. अडीच लाख पगारही उत्तम होता, सर्व सुख सोयी त्यांच्या हातात होत्या. कुठली गोष्ट घेणे अशक्य नव्हते. पण वयाची पन्नाशी गाठली आणि भाऊसाहेबांनी ऐन कोरोनाला संधी समजून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. जिथे लोक नोकरीसाठी धडपडत होते, तिथे भाऊसाहेबांनी मंदीमध्ये संधी शोधण्यासाठी इनडोअर पॉट-प्लांटस नर्सरीचा व्यवसाय सुरू केला आणि तो यशस्वी करुन दाखवला.
advertisement
शेतीसोबत पशुपालन, दिवसाला 4 हजारांची कमाई, साताऱ्यातील शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी!
स्वतःचे असे काही तरी करायचे होते, जिथे निर्णय घेताना कोणाचे बंधन नाही. मग 2020 साली नोकरी सोडून व्यवसायाची सुरुवात केली. ऑर्नामेंट्ल पॉट्रीट प्लांटची सुरुवात केली. खरेतर पूर्वी बंगले होते. परंतु आता फ्लॅट आले. तिथे तेवढी झाड लावता येत नाहीत. त्यामुळे घरातच झाड लावली तर आणि हे तंत्रज्ञान यूरोपमध्ये पूर्वी पासूनच होते. आता 150 पेक्षा जास्त प्रकारच्या व्हराइटी याठिकाणी उपलब्ध आहेत. हे सगळे दोन एकर जागेमध्ये तयार केले आहे.
advertisement
प्रयत्न केले तर त्यामध्ये नक्कीच यशस्वी मिळते -
सुरुवात केली तेव्हा माझे वय 50 होते. तसे या व्यवसायामध्ये कुटुंबाची देखील साथ मिळाली आहे. या व्यवसायासाठी 50 लाख रुपये गुंतवले होते आणि आता जर पाहिले तर दोन कोटीपर्यंत वार्षिक उलाढाल आहे. वय हा फक्त आकडा असतो. परंतु त्या वयाबरोबर आलेले अनुभव देखील असतात. प्रयत्न केले तर त्यामध्ये नक्कीच यशस्वी मिळते, अशी प्रतिक्रिया भाऊसाहेब नवले यांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 09, 2024 4:20 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Success Story : महिन्याला अडीच लाख रुपये पगाराची नोकरी सोडली, सुरू केला स्वतःचा व्यवसाय, आज कोटीत उलाढाल!