Ind vs Pak: सायरन वाजलं, सैनिक आले अन् अचानक गोळीबाराचा आवाज, पुण्यात असं का घडलं? Video

Last Updated:

या मॉकड्रिलचा उद्देश म्हणजे आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांची कार्यक्षमता तपासणे आणि विविध यंत्रणांमधील समन्वय वाढवणे हा होता. पुण्यातही  आज मॉकड्रिल आयोजित करण्यात आली होती. 

+
News18

News18

पुणे : जम्मू काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने नागरिकांची सजगता वाढवण्यासाठी देशभरात नागरी संरक्षण मॉकड्रिल करण्याचे आदेश दिले होते. या मॉकड्रिलचा उद्देश म्हणजे आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांची कार्यक्षमता तपासणे आणि विविध यंत्रणांमधील समन्वय वाढवणे हा होता. पुण्यातही  आज मॉकड्रिल आयोजित करण्यात आली होती.
या मॉकड्रिलमध्ये लष्कर, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, केंद्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दल महापालिका, नगरपालिका, आणि इतर संबंधित यंत्रणांनी संयुक्त सहभाग नोंदवला. त्याचबरोबर एनसीसी, एनएसएस, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नेहरू युवा केंद्राच्या समन्वयकांनीही सक्रिय भूमिका बजावली.
advertisement
प्रात्यक्षिकादरम्यान बॉम्बस्फोट, रासायनिक हल्ले, नागरिकांचे स्थलांतर, जखमींना मदत आणि अडकलेल्यांची सुटका यासारख्या विविध संकट परिस्थितींचा अभ्यास करण्यात आला. घटनास्थळी श्वान पथकाद्वारे स्फोटकांची तपासणी करण्यात आली आणि वैद्यकीय पथकांमार्फत जखमींवर त्वरित उपचार करण्यात आले.
पुणे विधानभवन, मुळशी पंचायत समिती, तळेगाव नगरपरिषद, वनाज औद्योगिक वसाहत तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात दुपारी चार वाजता ही कवायत एकाच वेळी राबवण्यात आली. सर्व यंत्रणांनी शिस्तबद्ध आणि काटेकोर पद्धतीने आपली भूमिका पार पाडली. काही महत्त्वाच्या प्रात्यक्षिकांची अंमलबजावणी विधानभवन परिसरात करण्यात आली.
advertisement
प्रशासनाकडून याबाबत स्पष्ट करण्यात आलं की, ही प्रात्यक्षिक केवळ चाचणी असून नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. या उपक्रमामागचा मुख्य हेतू म्हणजे युद्धजन्य किंवा अन्य आपत्तीजनक परिस्थितीत वेळीच मदत पोहोचवता यावी आणि जीवितहानी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करता याव्यात, यासाठीची तयारी तपासणं हा आहे.
मॉकड्रिलला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला आणि अशा प्रकारचे उपक्रम भविष्यात आणखी परिणामकारक ठरतील, असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी व्यक्त केला.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Ind vs Pak: सायरन वाजलं, सैनिक आले अन् अचानक गोळीबाराचा आवाज, पुण्यात असं का घडलं? Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement