रुपाली चाकणकरांचा अशोक खरातसोबतचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, NCP चा पदाधिकारी मात्र कोमात!
- Published by:Sachin S
Last Updated:
नाशिकमधील भोंदू आणि विकृत कॅप्टन अशोक खरात प्रकरण आता शिरूरपर्यंत पोहोचलं आहे. अशोक खरात याच्यासोबत रुपाली चाकणकर यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये
सचिन तोडकर, प्रतिनिधी
शिरूर: नाशिक जिल्ह्यातला भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्काराच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. पण, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे कॅप्टन अशोक खरात याच्यासोबत काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यापैकी एका व्हिडिओमध्ये शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी दिसत असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
नाशिकमधील भोंदू आणि विकृत कॅप्टन अशोक खरात प्रकरण आता शिरूरपर्यंत पोहोचलं आहे. अशोक खरात याच्यासोबत रुपाली चाकणकर यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी असल्याचं समोर आलं आहे. व्हिडिओत दिसणारी व्यक्ती ही शिरूर पंचायत समितीचे माजी उप सभापती राजेंद्र जासूद हे आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे काही कार्यकर्ते सुद्धा बसलेले आहे.
advertisement
[video width="476" height="850" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-20-at-17.09.38-2026-03-44d349d546ed4b7f2e6c8860bae56bb8.mp4"][/video]
या व्हिडिओत धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अशोक खरातच्या मागे शिरूर तालुक्यातील काही नेते बसले असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. त्याचा वावर अतिशय सहज असल्याने ही केवळ योगायोगाने झालेली भेट आहे की, यामागे काही वेगळे राजकीय किंवा सामाजिक समीकरण आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका किंवा स्पष्टीकरण समोर आलेले नसलं, तरी या व्हिडिओमुळे शिरूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
advertisement
कॅप्टन खरातसोबत सुनील तटकरेंचाही फोटो व्हायरल
एकीकडे पदाधिकारी अडचणीत सापडला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा कॅप्टन अशोक खरात सोबत एका फोटोमध्ये आढळले आहे. हा फोटो नेमका कुठला आहे हे समोर आलं नाही. पण, सुनील तटकरेंचा अशोक खरात सोबत फोटो समोर आल्यामुळे चर्चांना उधाण आहे. दरम्यान, या प्रकरणी SIT स्थापन झाली आहे, सखोलपणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी अशी, राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. कुणी दोषी आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही. SIT मार्फत चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 9:32 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
रुपाली चाकणकरांचा अशोक खरातसोबतचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, NCP चा पदाधिकारी मात्र कोमात!








