Iran War: खोल समुद्रात Attack! जगाचे इंटरनेट कापले जाणार; ई-मेल, व्हॉट्सॲप, फेसबुक आणि बँकिंग ठप्प होण्याची भीती
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
US-Iran conflict: अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम आता डिजिटल पायाभूत सुविधांवरही दिसू लागला असून महत्त्वाच्या अंडरसी इंटरनेट केबल प्रकल्पांवर परिणाम झाला आहे. जगातील 95% इंटरनेट वाहतूक या केबल्सवर अवलंबून असल्याने जागतिक कनेक्टिव्हिटी धोक्यात येण्याची भीती आहे.
अमेरिका-इराण युद्ध आता तिसऱ्या आठवड्यात पोहोचले आहे. या युद्धाचा परिणाम फक्त क्षेपणास्त्र, तेल किंवा लष्करी ठिकाणांपुरता मर्यादित राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. समुद्राच्या तळाशी असलेली इंटरनेट केबल्सही या संघर्षाच्या विळख्यात अडकू शकतात.
या संघर्षाचा डिजिटल पायाभूत सुविधांवर परिणाम होऊ लागल्याचे पहिले संकेत गेल्या आठवड्यात मिळाले; जेव्हा Meta ने Bloomberg ला सांगितले की त्यांनी त्यांच्या 2Africa प्रकल्पाचा एक भाग तात्पुरता थांबवला आहे. हा प्रकल्प 45,000 किमी लांबीचा अंडरसी केबल नेटवर्क असून आफ्रिका आणि गल्फ प्रदेशात इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी तयार केला जात होता.
हा थांबवलेला भाग ओमान, UAE, कतार, बहरीन, कुवेत, इराक, पाकिस्तान, भारत आणि सौदी अरेबिया या देशांमधील लँडिंग स्टेशनमधून जातो. या देशांपैकी (भारत वगळता) बहुतेक देश सध्या युद्धग्रस्त किंवा त्याच्या आसपासच्या क्षेत्रात आहेत. Meta कंपनीने या केबलचा हा भाग यावर्षीच सुरू करण्याची योजना आखली होती.
advertisement
याशिवाय या केबलचे काम करणाऱ्या फ्रान्सच्या सरकारी मालकीच्या Alcatel Submarine Networks कंपनीने ग्राहकांना ‘force majeure’ नोटिसा पाठवल्या आहेत. Bloomberg च्या अहवालानुसार या कंपनीचे केबल टाकणारे जहाज Ile De Batz हे सौदी अरेबियातील दमाम किनाऱ्याजवळ अडकून पडले आहे.
जगाचे इंटरनेट या पाण्यातून चालते
रेड सी आणि पर्शियन गल्फच्या समुद्रतळाखाली शेकडो फायबर ऑप्टिक केबल्स पसरलेल्या आहेत. ज्या जगातील 95% पेक्षा जास्त इंटरनेट ट्रॅफिक वाहून नेतात. याचा अर्थ तुमचे ई-मेल्स, व्हिडिओ कॉल्स, क्लाउड सेवा, आर्थिक व्यवहार आणि स्ट्रीमिंग सर्व काही या केबल्सवर अवलंबून आहे.
advertisement
Capacity Global च्या माहितीनुसार केवळ रेड सीमध्येच किमान 17 अंडरसी केबल्स आहेत. ज्या युरोप, आशिया आणि आफ्रिकाला जोडणारा महत्त्वाचा डेटा मार्ग तयार करतात. याशिवाय होर्मुझची सामुद्रधुनीही तितकीच महत्त्वाची आहे. TeleGeography च्या माहितीनुसार AAE-1, FALCON, Gulf Bridge International Cable System आणि Tata TGN Gulf यांसारख्या महत्त्वाच्या केबल्स या भागातून जातात.

(AI फोटो)
advertisement
या केबल्स Amazon, Microsoft आणि Google सारख्या कंपन्यांनी गल्फमध्ये उभारलेल्या डेटा सेंटर्सना जगभरातील अब्जावधी युजर्सशी जोडतात. मात्र समुद्री माईन्स, जहाजांचे अँकर किंवा थेट लष्करी कारवाईमुळे या केबल्स सहजपणे नुकसान होऊ शकतात. इराणने आधीच होर्मुझ सामुद्रधुनीत समुद्री माईन्स तैनात केल्यामुळे तिथे जहाजांची ये-जा थांबली आहे.
गेल्या वर्षी रेड सीमध्ये एका व्यावसायिक जहाजाच्या अँकरमुळे काही अंडरसी केबल्स तुटल्या होत्या, ज्याचा परिणाम भारत, पाकिस्तान आणि मध्य पूर्वेतील देशांच्या इंटरनेट सेवांवर झाला होता. रिपोर्टनुसार रेड सी हा भाग विशेषतः धोकादायक आहे कारण येथे केबल्स तुलनेने उथळ पाण्यात असतात त्यामुळे अँकरमुळे त्यांचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 9:31 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Iran War: खोल समुद्रात Attack! जगाचे इंटरनेट कापले जाणार; ई-मेल, व्हॉट्सॲप, फेसबुक आणि बँकिंग ठप्प होण्याची भीती








