Pahalgam Terror Attack : 'आम्हाला जिवंतपणी मारलं' रुपाली ठोंबरेंनी सांगितली 'पहलगाम'मधील दुसरी बाजू!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकाचा बळी गेला. अनेक ठिकाणचे पर्यटक देखील त्या ठिकाणी अडकले होते. मात्र ते आता सुखरूप आले असून त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे यांनी तेथील अनुभव लोकल 18 शी बोलतांनी सांगितला.
पुणे : जम्मू काश्मीर हे नावं घेतलं की सगळ्यांच्या मनात धडकी भरते. मंगळवारी दुपारची वेळ सगळ्या पर्यटकांना हादरवून टाकते. ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकाचा बळी गेला. जवळपास 26 जणं मारले गेले. तर अनेक ठिकाणचे पर्यटक देखील त्या ठिकाणी अडकले होते. मात्र ते आता सुखरूप आले असून त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे यांनी तेथील अनुभव लोकल 18 शी बोलतांनी सांगितला.
रुपाली ठोंबरे सांगतात की, देव बलवत्तर म्हणून वाचले. बघायला गेले होते स्वर्ग आणि जिवंतपणी अनुभवल्या नरकाच्या यातना. हा माझ्या एकटीचा अनुभव नाही. जेवढे पर्यटक होते त्यांनी अशा सोडल्या होत्या. जिथे हल्ला झाला त्याच्या आदल्या दिवशी जाऊन आले होते. ती बाई जिथे नवऱ्याची बॉडी घेऊन बसली होती तिथे आम्ही हसत हसत चहा मॅगी घेतली होती. काय सुंदर हा सगळा परिसर आहे, असं आम्ही म्हणत होतो.
advertisement
त्या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर लक्षात आलं की तिथे सुरक्षा रक्षक नव्हते. 16 किलोमीटरचा पल्ला घनदाट जंगल घोड्यावर बसून जाणे जीव मुठीत घेऊन जाण्याचा हा प्रवास आहे. परंतु पर्यटनासाठी जातो तेव्हा हा सगळा अनुभव येतोच. 50 रुपयेची मॅगी 300 रुपये, 20 रुपयेची कॉफी 200 रुपये. अप्रतिम काश्मीर खरं तर अनुभवयाला गेलो होतो. परंतु या अतिरेक्यांनी जो काही काश्मीर सुधारलेला आहे. काश्मीर मुस्लिम भारतीय झाले आहेत त्यांना दहशत देण्यासाठी हा प्रकार केला, असं मला वाटतं.
advertisement
त्यांनी त्या महिलेला न मारता तिला सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन सांगा. त्याच अतिरेक्यांनी तिथला काश्मिरी मुसलमान देखील मारला आहे. त्यांचा धर्म नाही सुधारलेला आहे. तिथली आर्थिक उलाढाल पर्यटक येतात बघवत नाहीये. वरती हल्ला झाला आहे खालचे लोक पळून जातात ती परिस्थिती अशी होती की आम्हाला गोळ्या घातल्या तर आम्ही करणार काय? त्यामुळे सगळे घाबरले होते भयभीत झाले होते. कधी काश्मीर सोडतोय, असं रुपाली ठोंबरे सांगतात.
advertisement
आज जे 26 जण गेले आहेत. त्याचे परिवार आता काय करणार? मी ही घटना घडली तेव्हा 90 किलोमीटरच्या परिसरात होते. खाली आल्यावर ही परिस्थिती कळाल्यावर नंतर ही काश्मीर कधी सोडते आणि परत काश्मीरला येयाच नाही. तिथल्या लोकल लोकांनी पर्यटकांना धीर दिला. त्यांनी त्यांना गोळ्या घालून मारलं पण आम्हाला जिवंतपणी मारलं ही भावना काश्मिरी लोकांमध्ये होती. आपण जिवंतपणी मेलो आणि ते अनुभवलं. या घटनेमुळे कुटुंब उध्वस्त होत आहे, अशा भावना रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केल्या.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
April 24, 2025 6:37 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pahalgam Terror Attack : 'आम्हाला जिवंतपणी मारलं' रुपाली ठोंबरेंनी सांगितली 'पहलगाम'मधील दुसरी बाजू!