Pehalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरने PM शहबाज शरीफची लाज काढली, पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाला?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आता एका पाकिस्तानी क्रिकेटरने या घटनेवर दु:ख व्यक्त करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफची इज्जत काढली आहे.
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 नागरीकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्यांसह स्टार क्रिकेटपटू आपली प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता एका पाकिस्तानी क्रिकेटरने या घटनेवर दु:ख व्यक्त करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफची इज्जत काढली आहे.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी पहलगाम येथील या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे आणि शोक व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
If Pakistan truly has no role in the Pahalgam terror attack, why hasn’t Prime Minister @CMShehbaz condemned it yet? Why are your forces suddenly on high alert? Because deep down, you know the truth — you’re sheltering and nurturing terrorists. Shame on you.
— Danish Kaneria (@DanishKaneria61) April 23, 2025
advertisement
दानिश कनेरिया यांनी एक्सवर लिहिले की, 'जर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची खरोखरच कोणतीही भूमिका नसेल तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अद्याप त्यावर प्रतिक्रिया का दिली नाही?' तुम्ही अचानक तुमच्या सैन्याला हाय अलर्टवर का ठेवले आहे? कारण तुम्हाला सत्य काय आहे हे माहित आहे. तुम्ही दहशतवाद्यांना पोसताय आणि पाठिंबा देताय. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशी बोचरी टीका दानिश यांनी शाहबाज शरीफवर केली.
advertisement
I am not speaking against Pakistan or its people. The Awam of Pakistan have suffered the most at the hands of terrorism. They deserve leadership that stands for peace, not one that shelters terrorists or stays silent when innocents are murdered.
I once wore Pakistan’s jersey… https://t.co/CDf17g0pkz
— Danish Kaneria (@DanishKaneria61) April 24, 2025
advertisement
दानिश कनेरिया हा पाकिस्तानच्या सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाजांपैकी एक खेळाडू होता. पण पाकिस्तान संघात धर्माच्या आधारावर भेदभाव आणि फिक्सिंग घोटाळ्यामुळे त्याची कारकीर्द लवकर संपू्ष्ठात आली होती.दानिश आता पाकिस्तान सोडून गेला आहे. तो त्याच्या कुटुंबासह अमेरिकेत स्थलांतरित झाला आहे. दानिशने अनेक वेळा पाकिस्तान क्रिकेट आणि भारतावर पाकिस्तानने केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यांचा उघडपणे विरोध केला आहे.
advertisement
राजीव शुक्ला काय म्हणाले?
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो आणि आम्ही पिडितांसोबत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. बीसीसीआयने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे थांबवावे का? यावर राजीव शुक्ला म्हणाले की,सरकार जी भूमिका घेईल, त्या भूमिकेसोबत आम्ही आहोत. सरकारच्या वृत्तीमुळे आम्ही पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळत नाही आणि भविष्यातही आम्ही पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार नाही. जेव्हा आयसीसी स्पर्धांचा विचार केला जातो तेव्हा आम्ही आयसीसीच्या सहभागामुळे खेळतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 24, 2025 6:26 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Pehalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरने PM शहबाज शरीफची लाज काढली, पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाला?