पार्थ पवारांना आता महसूल विभागाचा दणका, कंपनीला पाठवलं पत्र, इतके पैसे भरावेच लागणार, तरच...
- Published by:Sachin S
Last Updated:
पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव इथं ४० एकर जागा फक्त ३०० कोटींना खरेदी केली होती.
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पुण्यातील कोरेगाव इथं १८०० कोटींच्या जमीन खरेदी प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. अखेरीस हा व्यवहार आता रद्द करावा लागला आहे. ३०० कोटींमध्ये खरेदी केलेल्या जमिनीसाठी फक्त ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरलं होतं. आता हा व्यवहार रद्द जरी झाली तर त्यासाठी दंड भरावा लागणार आहे. नियमाप्रमाणे आता पार्थ पवार यांना 42 कोटी दंड भरावा लागणार आहे.
पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव इथं ४० एकर जागा फक्त ३०० कोटींना खरेदी केली होती. या जमिनीचा व्यवहार हा ३०० कोटींमध्ये झाला होता. पण, या डिलची कागदपत्र बाहेर आली आणि घोटाळा समोर आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अखेरीस २४ तासांच्या आत हा व्यवहार रद्द करण्यात आला अशी माहिती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यावी लागली. पण, हा व्यवहार रद्द झाला असला तरी पार्थ पवारांना मोठा दंड भरावा लागणार आहे.
advertisement
पार्थ पवार यांनी हा व्यवहार रद्द करण्यासाठी स्वत: बावधन परिसरातील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात आपल्या लिगल टीमसह हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज सादर केला होता. पण, व्यवहाराची नोंदणी झाली होती. त्यामुळे ठरलेल्या किंमतीनुसार मुद्रांक शुल्क भरण्यास सांगून अर्ज रद्द केला आहे. पार्थ पवार यांना सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाकडून त्रुटी अर्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता पार्थ पवारांना आता या व्यवहारासाठी कमीत कमी ४२ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे.
advertisement
आता दस्त रद्द करायचा असेल तर ४२ कोटी भरावे असं पत्रच महसूल विभागाकडून पार्थ पवार यांच्या अमेडिया एलएलपी कंपनीला देण्यात आलं आहे. आधीचं मुद्रांक शुल्क २१ कोटी आणि दस्त रद्द करण्यासाठी २१ कोटी असे म्हणून ४२ कोटी रुपये भरावे लागणार आहे. पूर्ण मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय अर्ज स्वीकारता येणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 07, 2025 10:42 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पार्थ पवारांना आता महसूल विभागाचा दणका, कंपनीला पाठवलं पत्र, इतके पैसे भरावेच लागणार, तरच...


