Municipal Election : पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती फुटली,पडद्यामागे नेमकं काय घडलं?
- Reported by:Govind Wakde
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची होऊ घातलेली युती देखील फुटल्याची माहिती समोर आली आहे.
Pimpari Chinchwad Municipal Election 2026 : पिपंरी चिंचवड: पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची होऊ घातलेली युती देखील फुटल्याची माहिती समोर आली आहे. खरं तर आजच पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी युती होण्यासाठी शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यात सकारात्मक चर्चा पार पडली होती.या चर्चेनंतर दोन्ही राष्ट्रवादीची युती होईल अशी चर्चा होती. पण आता पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती फिस्कटली आहे.त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या लढण्याची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कारण एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालीना वेग आलेला असताना आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाची युती होण्याची शक्यता निर्माण झाली.
दोनच दिवसांपूर्वी शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढतील अशी घोषणा दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांनी केली होती. मात्र या घोषणेला काही तास उलटून जाण्याच्या आधीच आता शिवसेना राष्ट्रवादीशी घरोबा करण्याच्या तयारीत आहे अशी माहिती समोर येते आहे.विशेष म्हणजे नव्या युतीच्या शक्यतेबाबत केवळ चर्चा नाही तर स्थानिक नेत्यांमध्ये बोलणी सुरू असून, सकारात्मक पद्धतीने जागा वाटपावर चर्चा झाली असून लवकरच घोषणा देखील केली जाईल अशी माहिती, शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद यांनी दिली आहे.
advertisement
दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची युती झाल्याने दोन्ही राष्ट्रवादीची युती तुटल्याचे बोलले जात आहे.
पुण्यात 'या' कारणामुळे युती फिस्कटली
खरं तर पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादीत युती होईल असे सगळ्यांनाच वाटत होते. पण आज अचानक ही युती होण्याआधीच फिस्कटल्याची माहिती समोर आली आहे. चिन्हावरून ही युती फिस्कटल्याची माहिती आहे.त्याच झालं असं की राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आज अजित पवार यांना भेटायला गेले होते. पण अजित पवार यांनी पुणे महापालिका निवडणुका राष्ट्रवादीच्या पारंपारिक घड्याळाच्या चिन्हावर लढवाव्यात असा आग्रह धरला होता. विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीत जागावाटपावरून एकमत झालं होतं. पण चिन्ह जे आहे ते घड्याळच राहिल,अशी अजित पवार यांची भूमिका होती. आणि यावर अजित पवार ठाम होते.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 5:01 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Municipal Election : पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती फुटली,पडद्यामागे नेमकं काय घडलं?











