मौत से क्या डरना... मृत्यूसमोर छाती ताणून उभा आहे सलमान खान, 60व्या बर्थडेला भाईजानचा VIDEO

Last Updated:

. 'मौत से क्या डरना उसे तो आना ही है' असं म्हणत सलमान खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काय आहे हा व्हिडीओ? पाहूयात. 

News18
News18
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आज 27 डिसेंबर रोजी त्याचा 60 वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे.  आपल्या 60 व्या बर्थडेच्या निमित्तानं एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तो मृत्यूविषयी बोलताना दिसतोय. 'मौत से क्या डरना उसे तो आना ही है' असं सलमान खान म्हणताना दिसतोय. सलमान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काय आहे हा व्हिडीओ? पाहूयात.
60 व्या बर्थडे निमित्तानं सलमान खानचा आगामी 'बॅटल ऑफ गलवान'चा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट भारतीय सैन्याच्या शौर्याला अर्पण केलेलं भावनिक अभिवादन ठरत आहे. टीझर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली असून, सलमान खानचा हा आतापर्यंतचा सर्वात गंभीर अवतार पाहायला मिळणार आहे.
'बॅटल ऑफ गलवान'मध्ये सलमान खान भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. कणखर देहयष्टी, शांत पण धारदार नजर आणि नियंत्रित आक्रमकता  या सगळ्यामुळे त्याचा हा लूक प्रेक्षकांच्या मनात घर करून जातो. टीझरच्या शेवटच्या क्षणी मृत्यूसमोर छाती ताणून उभा असलेला पाहायला मिळतोय.  सलमान खान पाहून अंगावर काटा येतो. मौत से क्या डरना उसे तो आना ही है.. असं तो ठासून बोलताना दिसतोय.
advertisement
टीझरमध्ये हिमालयातील अत्यंत कठोर आणि बर्फाच्छादित प्रदेशाचं वास्तववादी चित्रण करण्यात आलं आहे. उंच पर्वतरांगा, गोठवणारी थंडी आणि सीमांवर लढणाऱ्या सैनिकांची मानसिक व शारीरिक परीक्षा  हे सगळं प्रभावी पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. या दृश्यांना गायक स्टेबिन बेन यांच्या भावस्पर्शी आवाजाची साथ लाभली असून, त्यामुळे टीझरची भावनिक तीव्रता अधिकच वाढते. याशिवाय हिमेश रेशमिया यांचं दमदार पार्श्वसंगीत प्रत्येक फ्रेमला अधिक ताकद देताना दिसतं.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)



advertisement
दिग्दर्शक अपुर्व लखिया यांनी या चित्रपटातून केवळ युद्ध दाखवण्याऐवजी त्यामागील संघर्ष, त्याग आणि सैनिकांची अदम्य जिद्द पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘बॅटल ऑफ गलवान’ हा केवळ युद्धपट नाही, तर सीमांवर लढणाऱ्या जवानांच्या साहसाची, शौर्याची आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याच्या वृत्तीची कहाणी आहे. हा चित्रपट हेही अधोरेखित करतो की, शौर्य अमर असलं तरी खरा विजय शेवटी शांततेचाच असतो.
advertisement
या चित्रपटात अभिनेत्री चित्रांगदा सिंग देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. 'बॅटल ऑफ गलवान' हा सिनेमा 17 एप्रिल 2026 रोजी रिलीज होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
मौत से क्या डरना... मृत्यूसमोर छाती ताणून उभा आहे सलमान खान, 60व्या बर्थडेला भाईजानचा VIDEO
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement