सोलापूरमध्ये मविआचं ठरलं, सर्वाधिक जागा काँग्रेसला तर मनसेला भोपळा; वाचा कोणत्या पक्षाला किती?
- Reported by:Pritam Pandit
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूकच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.
सोलापूर : आगामी महापालिका निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. लोकसभा, विधानसभेप्रामाणेच निवडणुकीतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. लोकसभेच्यावेळी महाविकास आघाडीनं जागावाटप आणि उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला. आता महानगरपालिका निवडणुकीतही तोच पॅटर्न राबवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. सोलापूरमध्ये महाविकास आघाडीचं जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूकच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि मनसे हे चार पक्ष मिळून 102 जागा लढणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीत सामील झाली असून शिवसेना ठाकरे पक्षाच्या कोट्यातून मनसेला मिळणार जागा मिळणार आहे. काँग्रेस 45, शिवसेना ठाकरे गटाचे 30, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 20, माकप 7 असे जागा वाटप करण्यात आले आहे.
advertisement
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा 4 जानेवारीला नारळ फोडणार
महाविकास आघाडी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा 4 जानेवारीला नारळ फोडणार आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा. प्रणिती शिंदे, माजी आमदार आडम मास्तर, खा ओमराजे निंबाळकर, चंद्रकांत खैरे, खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महायुतीविरोधात महाविकास आघाडी करणार जोरदार प्रचार आहे.
advertisement
काँग्रेस पक्षाकडून पहिली वीस जणांची यादी जाहीर
तर सोलापूरमध्ये काँग्रेस पक्षाकडून पहिली वीस जणांची यादी करण्यात जाहीर करण्यात आली आहे . नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस जय्यत तयारीनिशी उतरत आहे. आज सोलापूर महानगरपालिकेसाठी 20 उमेदवारांची पहिली यादी पक्षाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली आहे.
advertisement
निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा
महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा असून उमेदवारीसाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी मागणी केली आहे. दोन दिवसापूर्वी मुंबईत राज्य निवड मंडळाच्या बैठकीत उमेदवार निश्चित करण्यात आले होते त्यानुसार सोलापूरसाठी ही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयाने दिली आहे. बदलत्या सत्तासमीकरणांमुळे यंदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
advertisement
हे ही वाचा :
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 4:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोलापूरमध्ये मविआचं ठरलं, सर्वाधिक जागा काँग्रेसला तर मनसेला भोपळा; वाचा कोणत्या पक्षाला किती?









