राज्यात महापालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजताच वेगवेगळ्या पक्षांची युती पाहायला मिळाली. त्यांच्या जागावाटपावर मोठ्या चर्चा चालू आहेत. त्यातच आता सोलापूरमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अजय दासरी,शहर प्रमुख महेश धाराशीवकर,मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्यात हॉटेल सीटीपार्क येथे बैठक सुरु असताना हा वाद उफाळला. उमेदवारीवरुन चर्चा चालू असताना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप दोन्ही गट करत होते. सोलापूर मनपाच्या प्रभाग क्रमांक 8 साठी शांत चालत असलेली बैठक पुढे हमरीतुमरीवर पोहोचली.
Last Updated: Dec 27, 2025, 16:47 IST


