शिलालेखापासून ते केसरी वृत्तपत्राचे माहिती देणारे फलक, पुणे पुस्तक महोत्सवात एक वेगळा स्टॉल, Video
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या पुस्तक महोत्सवात 700 हून अधिक स्टॉल 400 हून अधिक प्रकाशक देखील आपल्याला पाहिला मिळतात. तर यामध्ये अभिजात भाषेविषयी माहिती देणारे स्टॉल देखील पाहिला मिळत आहेत.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या तर्फे (नॅशनल बुक ट्रस्ट) पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. या पुस्तक महोत्सवात 700 हून अधिक स्टॉल 400 हून अधिक प्रकाशक देखील आपल्याला पाहिला मिळतात. तर यामध्ये अभिजात भाषेविषयी माहिती देणारे स्टॉल देखील पाहिला मिळत आहेत.
केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यानंतर मराठी साहित्य क्षेत्राला बळ मिळाले असून नवीन पिढीला मराठी भाषेबाबत संशोधन करण्यास वाव मिळणार आहे. मराठीचा प्रचार, प्रसार करण्यासही मदत होणार आहे. सामान्य लोकांमध्ये अभिजात भाषा म्हणजे काय याबाबत केंद्र आणि राज्य सरकार निधी स्वरूपात कशी मदत करणार आहे? याबाबतचं माहिती मिळावी याकरीता पुणे पुस्तक महोत्सवात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने एक वेगळा स्टॉल इथे उभारण्यात आला आहे.
advertisement
फर्ग्युसन महाविद्यालयाने लावलेल्या स्टॉलमध्ये शिलालेखापासून ते केसरी वृत्तपत्राचे मराठीबाबत माहिती देणारे फलक तसेच दुर्मिळ ग्रंथ ही इथे ठेवण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन करण्यासाठी या ग्रथांचा उपयोग होणार आहे.
मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा यासाठी वापरलेलं संदर्भ ग्रंथ पुरावे हे पुस्तक महोत्सवात पहिल्यांदा मिळत आहेत. याचा उद्देश हा ज्या मुलांना अभिजात म्हणजे काय? त्यासाठी कुठलं ग्रंथ वापरले किंवा इतर जे दुर्मिळ ग्रंथ आहे त्याची माहिती व्हावी तसंच पाहता यावे यासाठी हे कलादालन सुरू केले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी येऊन भेट द्यावी, असं आवाहन महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी केले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 17, 2024 2:53 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
शिलालेखापासून ते केसरी वृत्तपत्राचे माहिती देणारे फलक, पुणे पुस्तक महोत्सवात एक वेगळा स्टॉल, Video







