Pune Porsche Accident : अल्पवयीन आरोपी दारु प्यायला होता की नव्हता? अमितेश कुमार यांनी स्पष्टच सांगितलं

Last Updated:

Pune Porsche Accident Arrest Update : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत नवी माहिती दिली. आतापर्यंत या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आले आहेत.

पुणे पोर्श अपघातात नवी अपडेट समोर
पुणे पोर्श अपघातात नवी अपडेट समोर
पुणे : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Accident) पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत नवी माहिती दिली. आतापर्यंत या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आले आहेत. तीन आरोपींना सोमवारी अटक केलीय. तर अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी पोलीस पहिल्या दिवसापासून काम करत आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनीही फोन करून अपघाताबाबत माहिती दिली होती. पोलिसांच्या भूमिकेवर अनेकदा शंका व्यक्त केली गेली. पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही झाला. हा आरोप पुणे पोलीस आयुक्तांनी फेटाळून लावला.
आरोपी दारु प्यायला होता
मद्य प्राशनचा व्हिडीओ समोर आला आहे. मात्र रक्ताच्या चाचणीत दारू प्यायला नसल्याचं समोर आल्याची चर्चा होत आहे. त्याबाबत पुणे पोलीस आयुक्तांनी अद्याप ब्लड रिपोर्ट आले नसल्याचं सांगितलं. तसंच कोणताही रिपोर्ट निगेटिव्ह आलेले नाहीत. दोन वेगवेगळ्या ठिकाणी ब्लड रिपोर्ट घेतले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये कोणताही संभ्रम राहणार नाही. जे सत्य आहे ते समोर येईल. आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यानुसार तरुणांनी मद्य प्राशन केल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यांनी ऑनलाइन पेमेंट केलंय. त्याचे बिलही दारुचे आहे. त्यावरूनही त्यांनी दारू प्यायल्याचं स्पष्ट आहे. ब्लड रिपोर्ट येईल तेव्हा सविस्तर स्पष्ट करूच असंही पोलीस आयुक्त म्हणाले.
advertisement
आरोपीला सज्ञान मानून शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न
कोर्टाची बेल ऑर्डर सार्वजनिक आहे. त्यात आरोपी दारुचा व्यसनी असल्याचं सांगितलंय. त्यावर मला बोलणं योग्य वाटत नाही. हे स्पष्ट आहे की रविवारी दोन अर्ज केले. हा भयंकर गुन्हा आहे. यात ७ वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे. त्याचे वय १६ वर्षाच्या वर आहे. त्यामुळे कलम १५ अंतर्गत त्यांना सज्ञान मानून शिक्षा व्हायला हवी. कायद्यात अशी तरतूद आहे. यात दोघांचा मृत्यू झालाय. अरुंद रस्त्यावर वेगाने वाहन चालवत होते. मद्यप्राशन करून त्यांनी हे कृत्य केल्यानं त्यांना गुन्हा दाखल व्हायला हवं. जोपर्यंत अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत रिमांड होमला पाठवावं अशी विनंती केली होती. मात्र कोर्टाने ती फेटाळली.
advertisement
मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे आदेश
मुख्यमंत्री शिंदेंनी फोन केला होता. गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांनी फोन केला होता. पोलीस महासंचालकांनी फोन करून सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी. पोलीस कारवाई करत नसल्याची प्रतिमा दूर व्हायला हवी. जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. त्याच अनुषंगाने पहिल्या दिवसापासून पोलीस काम करत आहेत असंही पोलीस आय़ुक्तांनी स्पष्ट केलं.
advertisement
आरोपींना पिझ्झा बर्गर दिला की नाही?
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुण तरुणीच्या नातेवाईकांना येरवडा पोलिसांकडून वाईट वागणूक मिळाल्याचे आरोप झाले आहेत. तसंच आरोपींना पिझ्झा, बर्गर पोलिसांनी दिल्याचे आरोप अपघातातील पीडितांच्या नातेवाईकांनी केलेत. यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं की, या अपघात प्रकरणी चौकशीसाठी अधिकारी नेमले आहेत. नातेवाईकांना वाईट वागणूक दिलेली नाही. यात कोणताही पोलीस अधिकारी, कर्मचारी आरोपीला मदत करत असल्याचं आढळून आलं किंवा नातेवाईकासोबत वाईट वागल्याचं आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Porsche Accident : अल्पवयीन आरोपी दारु प्यायला होता की नव्हता? अमितेश कुमार यांनी स्पष्टच सांगितलं
Next Article
advertisement
High Court On Mumbai Air Pollution: हवा प्रदूषणावर हायकोर्टाने चालवला कारवाईचा चाबूक, थेट आयुक्तांचा पगार रोखला, कोर्टात घडलं काय?
हवा प्रदूषणावर हायकोर्टाने चालवला कारवाईचा चाबूक, थेट आयुक्तांचा पगार रोखला, कोर
  • हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवरून (AQI) उच्च न्यायालयाने आज महापालिका प्रशासनाचे अक्

  • याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टासमोर धक्कादायक माहिती मांडली.

  • महापालिका आयुक्तांचे वेतन का रोखू नये असा सवाल हायकोर्टाने विचारला.

View All
advertisement