Pune Porsche Car Accident : लाडकी लेक बाबांना देणार होती सरप्राइज, तिकीट केलेलं बूक पण....

Last Updated:

Pune Porsche Victim Ashwini Costa Story : पोर्शे कार अपघातात राजस्थानमधील अनिस अवधिया आणि मध्य प्रदेशातील अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. अश्विनी तिच्या वडिलांना वाढदिवसाला सरप्राइज देणार होती.

अश्विनीची इच्छा राहिली अपूर्ण
अश्विनीची इच्छा राहिली अपूर्ण
पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन मुलाने दारु पिऊन बेदरकारपणे पोर्शे कारने उडवल्यानं दोघांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह चौघांना अटक झाली आहे. अल्पवयीन मुलाला गाडी दिल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय पब आणि बार चालकांवर अल्पवयीनांना दारु पुरवल्याप्रकरणी अटक झालीय. या अपघातात राजस्थानमधील अनिस अवधिया आणि मध्य प्रदेशातील अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. कारने धडक देताच अश्विनी कोस्टा हवेत १० ते १५ फूट उंच उडाली होती. त्यानंतर रस्त्यावर जोरात आपटल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर (Pune Porsche Car Accident) अश्विनी आणि अनिस यांचे मृतदेह ससून रुग्णालयात ठेवले होते. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेल्या अश्विनीच्या आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अश्विनीच्या वडिलांचा वाढदिवस पुढच्या महिन्यात होता. त्यासाठी वडिलांना सरप्राइज देण्याचा प्लान तिने केला होता. वडिलांच्या वाढदिवसासाठी ती १८ जूनला जबलपूरला जाणार होती आणि त्यांच्यासाठी सरप्राइज पार्टीही ठेवली होती. तिने जबलपूरला जाण्यासाठी तिकीटही बूक केलं होतं पण त्याआधीच भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला. श्रीमंत बापाच्या मुलाच्या चुकीने आम्ही आमची मुलगी गमावली. एखाद्या हुल्लडबाजाने केलेल्या चुकीची शिक्षा आमच्या मुलीला झाली अशा भावना अश्विनीच्या आईने व्यक्त केल्या.
advertisement
कोण होती अश्विनी कोस्टा?
अश्विनी कोस्टा (Pune Porsche Victim Ashwini Costa Story) ही मूळची जबलपूरची असून ती पुण्यात आयटी कंपनीत नोकरीला होती. नुकतंच ती एमेझॉनमधून जॉन्सन्समध्ये रुजू झाली होती. रविवारी ती पार्टीसाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती. तिथून निघताना कल्याणीनगरमध्ये तिच्या दुचाकीला पोर्शे कारने धडक दिली. अश्विनी कोस्टाने तिचं प्राथमिक शिक्षण जबलपूरमध्येच झालं. अश्विनी आणि अनिश एकाच कंपनीत काम करत होते. ते पार्टीनंतर घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला.
advertisement
आरोपींना पिझ्झा बर्गर दिला की नाही?
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुण तरुणीच्या नातेवाईकांना येरवडा पोलिसांकडून वाईट वागणूक मिळाल्याचे आरोप झाले आहेत. तसंच आरोपींना पिझ्झा, बर्गर पोलिसांनी दिल्याचे आरोप अपघातातील पीडितांच्या नातेवाईकांनी केलेत. यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं की, या अपघात प्रकरणी चौकशीसाठी अधिकारी नेमले आहेत. नातेवाईकांना वाईट वागणूक दिलेली नाही. यात कोणताही पोलीस अधिकारी, कर्मचारी आरोपीला मदत करत असल्याचं आढळून आलं किंवा नातेवाईकासोबत वाईट वागल्याचं आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Porsche Car Accident : लाडकी लेक बाबांना देणार होती सरप्राइज, तिकीट केलेलं बूक पण....
Next Article
advertisement
High Court On Mumbai Air Pollution: हवा प्रदूषणावर हायकोर्टाने चालवला कारवाईचा चाबूक, थेट आयुक्तांचा पगार रोखला, कोर्टात घडलं काय?
हवा प्रदूषणावर हायकोर्टाने चालवला कारवाईचा चाबूक, थेट आयुक्तांचा पगार रोखला, कोर
  • हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवरून (AQI) उच्च न्यायालयाने आज महापालिका प्रशासनाचे अक्

  • याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टासमोर धक्कादायक माहिती मांडली.

  • महापालिका आयुक्तांचे वेतन का रोखू नये असा सवाल हायकोर्टाने विचारला.

View All
advertisement