Pune Crime : पुण्यात माया टोळीने वापरला 'आंदेकर टोळीचा पॅटर्न', मयंकसोबत दुपारी 3:15 ला काय घडलं?

Last Updated:

Pune Bajirao Road Mayank Kharade Murder : पुण्यातील अतिशय वर्दळीच्या बाजीराव रस्त्यावरून दुचाकीने जात असलेल्या तिघांवर आरोपींनी कोयत्याने हल्ला चढवल्याचं समोर आलं आहे.

Pune Bajirao Road Mayank Kharade Murder Maya gang use
Pune Bajirao Road Mayank Kharade Murder Maya gang use
Pune Bajirao Road Murder Crime : पुण्यातल्या कोंढवा भागातील खडी मशीन चौकात गणेश काळे याचा खून होऊन तीन दिवस उलटले नसताना पुण्यात बाजीराव रस्त्यावर तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्याचं काल समोर आलं. पुणे शहरात नव्याने उदयास आलेल्या 'माया टोळी'च्या सदस्यांनी पोलिसांना खुलं आव्हान दिलं आहे. पुण्यातील अतिशय वर्दळीच्या बाजीराव रस्त्यावरून दुचाकीने जात असलेल्या तिघांवर आरोपींनी कोयत्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून दुसऱ्या तरुणालाही दुखापत झाली आहे. माया टोळीने 'आंदेकर टोळीचा पॅटर्न' वापरल्याचं समोर आलं आहे.

आरोपींनी केस कोयत्याने छाटले आणि बोट कापलं

मयत मयंक खराडे आणि त्याचा मित्र अभिजीत इंगळे टुव्हिलरवरून जात असताना जनता वसाहतमधील मास्क लावलेल्या तीन तरुणांनी त्यांचा पाठलाग केला अन् त्यांना गाठलं. त्यावेळी आरोपींनी धारदार शस्त्रांचा, विशेषत: कोयत्याचा वापर करत मयंक खराडे याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. त्यामुळे त्याचा मित्र अभिजीत देखील घाबरला. या हल्ल्यात आरोपींनी मयंक खराडेचे केस कोयत्याने छाटले आणि बोटही कापल्याची माहिती मिळाली आहे. आरोपींच्या या क्रूर हल्ल्यात मयंक खराडे याचा जागीच मृत्यू झाला.
advertisement

आंदेकर टोळीचा पॅटर्न

आरोपींनी कापलेले बोट रस्त्यावर पडल्याचं दृश्य पाहायला मिळालं होतं. त्यामुळे बाजीराव रोडवर एकच खळबळ उडाली होती. दुपारच्या सव्वा तीन वाजता घटना घडल्याने पुण्यात बातमी वाऱ्यासारखी पसरली. बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप उद्यानाजवळ, दखनी मिसळसमोर ही घटना घडली. मयंक खराडेच्या खून प्रकरणात अभिजीत पाटील उर्फ माया, अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे या तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पण यावेळी माया टोळीने आंदेकर टोळीचा पॅटर्न वापरला.
advertisement

पुण्यातील कोयता पॅटर्न कधी संपणार?

पोलिसांनी अटक केलेले आरोपी देखील अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच हत्या करण्यासाठी आंदेकर टोळीप्रमाणे माया टोळीने देखील कोयत्याचा वापर केला होता. त्यामुळे आता पुण्यातील कोयता पॅटर्न कधी संपणार? असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत.

माया टोळीचा म्होरक्या कोण?

advertisement
दरम्यान, अभिजीत पाटील हा माया टोळीचा म्होरक्या आहे. सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याला पुणे शहरातून तडीपार करण्यात आले आहे. अतिशय तरुण वयात अभिजीत उर्फ मायाने गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला. अभिजीत हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या नावावर गंभीर मारहाण, हत्येचा प्रयत्न, खंडणी आदी गुन्हे दाखल आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्यात माया टोळीने वापरला 'आंदेकर टोळीचा पॅटर्न', मयंकसोबत दुपारी 3:15 ला काय घडलं?
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement