मद्यधुंद तरुण-तरुणीचा धिंगाणा; आधी महिला पोलिसाला घेतला चावा, मग आणखीच धक्कादायक कृत्य, बाणेरमध्ये रात्रभर गोंधळ
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यास सांगितल्यावर मानसीने एका महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या युनिफॉर्मला हात घातला, त्यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्या उजव्या हाताचा चावा घेतला.
पुणे : दारूच्या नशेत भान हरपलेल्या एका तरुणीने आणि तिच्या मित्राने चक्क पोलिसांवरच हात उचलल्याची धक्कादायक घटना बाणेर परिसरात उघडकीस आली आहे. बालेवाडी येथील 'एजंट जॅक' बार आणि बाणेर पोलीस ठाण्यात हा थरार ३ मार्च ते ४ मार्चच्या पहाटेपर्यंत सुरू होता. मानसी चंपलाल परिहार्या (२४) आणि युवराज नीलेश परतानी (२४) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
नेमका प्रकार काय?
मानसी आणि युवराज हे दोघे बालेवाडी येथील 'एजंट जॅक' बारमध्ये पार्टीसाठी गेले होते. मद्यधुंद अवस्थेत असताना त्यांचे तिथे कोणाशी तरी वाद झाले. पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी पोलिसांशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजच्या मागणीवरून त्यांनी बारमध्ये गोंधळ घातला. त्यानंतर पोलीस त्यांना अधिक चौकशीसाठी बाणेर पोलीस ठाण्यात घेऊन आले.
advertisement
पोलिसांवरच हात उचलला
पोलीस ठाण्यात आणल्यानंतरही दोघांची अरेरावी थांबली नाही. वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यास सांगितल्यावर मानसीने एका महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या युनिफॉर्मला हात घातला, त्यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्या उजव्या हाताचा चावा घेतला. युवराजनेही पोलिसांना 'तुमची नोकरी घालवेन' अशी धमकी दिली. मानसीने तर, "मी सुसाईड करून तुमची नावे लिहीन," अशी धमकी देत पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
advertisement
सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी बाणेर पोलिसांनी दोघांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक पाथरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दारूच्या नशेत कायदा हातात घेणाऱ्या या दोघांच्या कृतीमुळे परिसरात मोठा संताप व्यक्त होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 10:46 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
मद्यधुंद तरुण-तरुणीचा धिंगाणा; आधी महिला पोलिसाला घेतला चावा, मग आणखीच धक्कादायक कृत्य, बाणेरमध्ये रात्रभर गोंधळ










