Pune Crime : आठ महिन्यांपूर्वी लग्न, देवीच्या मिरवणुकीत गेला अन् काळाने केला घात, पुण्यातील वाघोलीत धक्कादायक घटना!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Crime News : पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे. या दुर्घटनेमागील नेमकं कारण काय होतं? याचा तपास पोलीस करत आहेत.
Pune Crime News : पुण्यातील वाघोलीतील उबाळेनगर परिसरात सोमवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. देवीच्या मिरवणुकीदरम्यान शॉक लागून नितीन पवार या 22 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. वाघोलीच्या उबाळेनगरमध्ये हा तरुण राहत होता. आठ महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. मात्र, देवीच्या मिरवणुकीत त्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सायंकाळी देवीची मिरवणूक निघाली अन्...
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी देवीची मिरवणूक निघाली होती. नितीन या मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाला होता. तो ट्रॅक्टरच्या मागे उभा असताना त्याला अचानक जोरदार शॉक बसला. या धक्क्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
आकस्मित मृत्यूची नोंद
advertisement
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आवश्यक ते शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याच्या कर्नाटक येथील मूळ गावी पाठवण्यात आला. या घटनेची पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे. या दुर्घटनेमागील नेमकं कारण काय होतं? याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना
पुणे शहरात एकीकडे टोळ्यांच्या मुसक्या अवळल्या जात असताना दुसरीकडे पोलिसांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना लॉ कॉलेज रोडवर मध्यरात्री घडली. गुन्हे शाखेतील एका पोलिस कर्मचार्यावर कोयत्याने वार केल्याचा हा प्रकार घडला असून याप्रकरणी डेक्कन जिमखाना पोलिसांनी दुचाकीस्वारासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 08, 2025 9:37 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : आठ महिन्यांपूर्वी लग्न, देवीच्या मिरवणुकीत गेला अन् काळाने केला घात, पुण्यातील वाघोलीत धक्कादायक घटना!