पंतप्रधानांच्या नातीचा सिनेमात सुपरहिट डेब्यू, पण अचानक झाली गायब; मग OTT वर जबरदस्त कमबॅक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आजची गोष्ट अशाच एका 'राजकुमारी'ची आहे, जिने राजवाड्याचं सुख सोडून सिनेसृष्टीची खडतर वाट निवडली, जिने यशाचं सर्वोच्च शिखर पाहिलं आणि दुर्दैवाने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा सामनाही केला.
आपण आपल्या आयुष्यात अनेकदा संकटांनी खचून जातो. एखादं मोठं संकट आलं की वाटतं आता सगळं संपलं. पण खरी जिद्द तिलाच म्हणतात, जी शून्यातून विश्व निर्माण करते आणि मृत्यूच्या दारातून परत येऊन पुन्हा यशाचं शिखर गाठते. आजची गोष्ट अशाच एका 'राजकुमारी'ची आहे, जिने राजवाड्याचं सुख सोडून सिनेसृष्टीची खडतर वाट निवडली, जिने यशाचं सर्वोच्च शिखर पाहिलं आणि दुर्दैवाने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा सामनाही केला.
advertisement
advertisement
16 ऑगस्ट 1970 रोजी नेपाळच्या काठमांडूमध्ये मनीषाचा जन्म झाला. ती साधीसुधी मुलगी नव्हती, तर चक्क नेपाळच्या राजघराण्यातील राजकुमारी होती. तिचे आजोबा बी.पी. कोईराला हे नेपाळचे पहिले पंतप्रधान होते. राजकारण आणि सत्तेच्या गराड्यात वाढलेली ही मुलगी पडद्यावर नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आली. 1991 मध्ये सुभाष घई यांच्या 'सौदागर' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आणि पहिल्याच सिनेमातून ती रातोरात स्टार झाली.
advertisement
90 च्या दशकातील 'क्वीन' आणि सुवर्णकाळसौदागरनंतर मनीषाने मागे वळून पाहिलं नाही. '1942: ए लव्ह स्टोरी', 'बॉम्बे', 'दिल से', 'खामोशी' आणि 'मन' यांसारख्या सिनेमांतून तिने अभिनयाची अशी जादू चालवली की तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. 90 च्या दशकात ती टॉपची अभिनेत्री होती. तिचे सौंदर्य आणि तितकाच दमदार अभिनय पाहून प्रत्येक दिग्दर्शकाला तिला आपल्या सिनेमात घ्यायचं होतं. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाच काही फ्लॉप चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांमुळे तिला थोडा संघर्ष करावा लागला.
advertisement
2012 मध्ये मनीषाच्या आयुष्यात सर्वात मोठं वादळ आलं. तिला डिम्बग्रंथीचा कर्करोग (Ovarian Cancer) असल्याचं निदान झालं. ज्या चेहऱ्याने करोडो लोकांना वेड लावलं होतं, तो चेहरा आता रुग्णालयाच्या बेडवर वेदना सहन करत होता. न्यूयॉर्कमध्ये तिच्यावर उपचार झाले. मृत्यूशी वर्षभर झुंज दिल्यानंतर 2013 मध्ये ती कॅन्सरमुक्त झाली. तिने तिचा हा प्रवास 'हील्ड' (Healed) या पुस्तकातून जगासमोर मांडला, जो आजही अनेक रुग्णांसाठी प्रेरणादायी ठरतोय.
advertisement
कॅन्सरनंतर मनीषाने हार मानली नाही.2017-18 मध्ये 'डियर माया', 'लस्ट स्टोरीज' आणि 'संजू' सारख्या चित्रपटातून तिने कमबॅक केलं. पण तिचं खरं 'विराट' रूप पाहायला मिळालं ते संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सीरिजमध्ये. 'मलिकाजान' ही व्यक्तिरेखा तिने इतक्या ताकदीने साकारली की पुन्हा एकदा जगाला मनीषा कोईराला नावाच्या सैंदर्याची जाणीव झाली.
advertisement











