Raigad: जीव गेला तरी वार करत होता, काळ्या जॅकेटवाला 'तो' कोण? मंगेश काळोखेंच्या हत्येचे मन विचलित करणारे PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
तरीही मागून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी वार केले. यामध्ये सगळ्यात शेवटी आलेल्या काळ्या जॅकेटमधील मारेकऱ्याने कुऱ्हाडीने काळोखे यांच्यावर वार करतााना दिसून येत आहे
नगरपरिषद निवडणुकीनंतर राज्यभरात महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला जोरदार तयारी सुरू आहे. अशातच रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. काळोखे यांच्या हत्येचा सीसीटीव्ही समोर आला. यामध्ये ५ मारेकरी दिसत आहे. पण, सगळ्यात शेवटी आलेल्या पाचव्या मारेकऱ्याने काळोखे यांच्या मृत्यूनंतरही वार करत होता.
advertisement
मंगेश काळोखे हे खोपोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते. आपल्या बायकोच्या विजयात त्यांचा सिंहाचाा वाटा होता. मानसी काळोखे यांच्या विजयासाठी काळोखे यांनी खूप मेहनत केली होती. अखेरीस ही मेहनत विजयात बदली. या विजयामुळे शिवसेनेत जल्लोषाचं वातावरण होतं. विजयी रॅलीही काढली होती. पण पुढे काय घडेल याची कल्पना नव्हती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ते भरत भगत, रवींद्र देवकर, धनेश देवकर, दर्शन देवकर, सचिन चव्हाण, रवींद्र देवकर यांचा बाऊंसर आणि इतर तीन अनोळखी लोकांविरोधात खोपोली पोलिसात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.










