Pune Crime : पुण्यातील MIT महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये सापडला मृतदेह, फुसरंगीतून 8 दिवसांपासून बेपत्ता; घातपाताचा संशय?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Body found on MIT College campus : पुण्यातील लोणी परिसरातील प्रसिद्ध एमआयटी (MIT) कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Pune Crime News (अभिजित पोटे, प्रतिनिधी) : पुण्यातील लोणी परिसरातील प्रसिद्ध एमआयटी (MIT) कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुभाष कामठे असं या मृत व्यक्तीचं नाव असून, ते गेल्या आठ दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. कामठे यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुळामुठा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या कॉलेजच्या मागील बाजूस हा मृतदेह आढल्याची माहिती समोर आली आहे.
आत्महत्या की हत्या?
मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह गुरुवारी दुपारी कॅम्पसमध्ये आढळून आला. सुभाष कामठे हे मूळचे पुण्यातीलच फुरसुंगी परिसरातील रहिवासी होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात त्यांना दारूचे व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ही आत्महत्या आहे की हत्या? असा सवाल विचारला जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
advertisement
फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष कामठे हे शेतकरी असून कुटुंबासोबत फुरसुंगी परिसरात राहतात. कामठे हे मागील आठ दिवसांपूर्वी बेपत्ता झाले आहेत. अशी तक्रार कामठे यांच्या नातेवाईकांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह मच्छीमारांना एमआयटी कॉलेजच्या परिसारातील मुळामुठा नदीच्या किनाऱ्यावर सापडला.
एमआयटी कॉलेजच्या परिसरात खळबळ
advertisement
दरम्यान, सुभाष कामठेच्या मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात भरपूर पाऊस झाल्याने एमआयटी कॉलेजच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. तर मुळामुठा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने मृतहेद वाहून आल्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे आता पोलिसांना तपास करताना मोठी अडचण येण्याची शक्यता आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 20, 2025 2:27 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्यातील MIT महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये सापडला मृतदेह, फुसरंगीतून 8 दिवसांपासून बेपत्ता; घातपाताचा संशय?