IPL 2026 : संजू सॅमसनची 'एक्झिट', कोण होणार राजस्थान रॉयल्सचा नवा कॅप्टन? चार खेळाडूंवर RR ची नजर!

Last Updated:
New Captain Of Rajastan Royals : आयपीएलच्या ट्रेड विंडोमध्ये मोठी उलथापालथ सुरू असताना, एका संघासमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आहे. राजस्थान रॉयल्सचा (RR) सध्याचा कॅप्टन संजू सॅमसन हा चेन्नई सुपर किंग्ज (CSK) मध्ये ट्रेड होण्याची शक्यता जोरदारपणे वर्तवली जात आहे.
1/5
संजूने फ्रेंचायझी सोडल्यास, राजस्थान रॉयल्सला केवळ एका स्टार फलंदाजाची उणीव भासणार नाही, तर संघाचे नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी कोणाच्या खांद्यावर द्यायची, हा कठीण निर्णय घ्यावा लागणार आहे.

advertisement
2/5
संजू सॅमसनच्या संभाव्य एक्झिटमुळे, राजस्थानचा नवा कर्णधार कोण असेल याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. या शर्यतीत दोन नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. पहिले, स्फोटक ओपनर यशस्वी जयस्वाल. यशस्वीकडे अनुभव नसल्याने राजस्थान एवढा मोठा निर्णय घेणार का? हे पहावं लागेल.

3/5
राजस्थानकडील दुसरा पर्याय म्हणजे युवा ऑलराऊंडर रियान पराग... रियान पराग याने मागील सिझनमध्ये बॅटने अप्रतिम कामगिरी करत आपली क्षमता सिद्ध केली आहे. संजूच्या अनुपस्थितीत त्याने काही मॅचमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे आणि त्याला आसामच्या डोमेस्टिक टीमच्या कॅप्टनशिपचा अनुभवही आहे.

4/5
या दोन मुख्य दावेदारांव्यतिरिक्त, युवा विकेटकीपर बॅटर ध्रुव जुरैल हा देखील एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. त्याने आपल्या शांत आणि मॅच्योर खेळाने सर्वांना प्रभावित केले आहे. तो भविष्यात नेतृत्वाच्या भूमिकेसाठी एक उत्तम उमेदवार मानला जात आहे.

5/5
याचबरोबर, नितीश राणा याचे नाव देखील पर्यायामध्ये असू शकते. नितीश राणा सध्या राजस्थानमध्ये असल्याने तो देखील रेसमध्ये आहे. आयपीएलमध्ये त्याने कोलकाता नाइट रायडर्स (KKR) चे प्रभावीपणे नेतृत्व केलं आहे. त्यामुळे, राजस्थान रॉयल्स त्याला थेट कर्णधारपदाची जबाबदारी देऊ शकते.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement