Pune Crime : आय लव्ह यू... बायकोच्या फोनवरुन मित्राला मेसेज, 'दृश्यम स्टाईल'ने पत्नीचा मर्डर करणाऱ्या समीरने कसा तयार केला डिजिटल पुरावा?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Anjali Jadhav Murder Case : अंजलीचं एक्ट्रा मॅरेटियर अफेअर असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. समीरने अंजलीविरुद्ध एक डिजिटल पुरावा रचल्याचं पहायला मिळालं.
Pune Crime News : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा गाजलेला दृश्यम हा चित्रपट चार वेळा पाहून पुण्यातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाड्याने घेतलेल्या गोडाऊनमध्ये आरोपी समीर याने आपल्या पत्नीने भट्टीत जाळलं अन् पुरावे नष्ट केले. तसेच समीरने अंजलीचा मृतदेह जाळून त्याने राख जवळच्या नदीत फेकून दिली. मात्र, पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला अन् आरोपीच्या मुसक्या आवळल्या. अशातच आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अंजलीचं एक्ट्रा मॅरेटियर अफेअर?
समीरने अंजलीविरुद्ध एकही पुरावा ठेवला नाही. अनेक अँगलने समीरने पत्नीविरुद्ध पुरावे रचण्यास सुरूवात केली. समीरचे एका मुलीसोबत विवाहबाह्य संबंध होते. पण समीरने पत्नी अंजलीचं एक्ट्रा मॅरेटियर अफेअर असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. समीरने अंजलीविरुद्ध एक डिजिटल पुरावा रचल्याचं पहायला मिळालं.
मित्राच्या फोनवरून आय लव्ह यूचा मेसेज
advertisement
पत्नी अंजलीच्या चारित्र्यावर संशय यावा यासाठी समीरने स्वत: पत्नीच्या मोबाईलवरून मित्राला आय लव्ह यूचा मेसेज केला अन् मित्राच्या मोबाईलमधून त्या आय लव्ह यूला रिप्लाय देखील केला. यामुळे पत्नीच्या चारित्र्यावर संशय येईल, असा डिजिटल पुरावा तयार केला गेला. मात्र, समीरचं वागणं पोलिसांना खटकलं अन् संशयाची सुई पुन्हा समीरवर गेली.
'दृश्यम' चित्रपट चार वेळा पाहिला अन्...
advertisement
दरम्यान, समीरच्या जबाबांमध्ये आणि तांत्रिक पुराव्यांमध्ये तफावत आढळल्याने त्याला अधिक चौकशीसाठी बोलावण्यात आले. तिथे त्याने 'दृश्यम' हा चित्रपट चार वेळा पाहून गुन्हा कबूल केला. आपणच अंजलीच्या हत्येची योजना आखली होती, असं त्याने कबूल केलं आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 10, 2025 12:15 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : आय लव्ह यू... बायकोच्या फोनवरुन मित्राला मेसेज, 'दृश्यम स्टाईल'ने पत्नीचा मर्डर करणाऱ्या समीरने कसा तयार केला डिजिटल पुरावा?


