advertisement

दुचाकीवरील तरुणाला रस्त्यात थांबवलं; आधी पत्ता विचारला अन् मग कांड, पुण्यातील फुरसुंगी भागात काय घडलं?

Last Updated:

भेकराई नगर परिसरात राहणारा २७ वर्षीय तरुण एका खासगी कंपनीत नोकरी करतो. बुधवारी रात्री काम संपवून तो आपल्या दुचाकीवरून सासवड रोडने घरी जात होता.

दुचाकीवरील तरुणाला लुटलं (AI Image)
दुचाकीवरील तरुणाला लुटलं (AI Image)
पुणे : पुणे शहरातील फुरसुंगी भागात चेन स्नॅचिंगची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दुचाकीवरून घरी परतणाऱ्या एका तरुणाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून, चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील १ लाख २२ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केली. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
भेकराई नगर परिसरात राहणारा २७ वर्षीय तरुण एका खासगी कंपनीत नोकरी करतो. बुधवारी (२१ जानेवारी) रात्री काम संपवून तो आपल्या दुचाकीवरून सासवड रोडने घरी जात होता. फुरसुंगी येथील एनआयबीएम (NIBM) कंपनीजवळ आल्यानंतर, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्याला थांबवण्याचा इशारा केला.
advertisement
बोलण्यात गुंतवून लूट: चोरट्यांनी काहीतरी विचारण्याच्या बहाण्याने तरुणाला बोलण्यात गुंतवले. तरुणाला काही समजण्याच्या आतच, चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील सोन्याच्या चेनवर झडप घातली आणि ती हिसकावून सुसाट वेगाने पसार झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुण गोंधळून गेला होता. त्याने आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत चोरटे नजरेआड झाले होते.
फिर्यादी तरुणाने दिलेल्या वर्णनानुसार, पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. सासवड रोडवरील पेट्रोल पंप आणि आसपासच्या दुकानांमधील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले जात आहेत. रात्रीच्या वेळी निर्मनुष्य ठिकाणी कोणाशीही बोलण्यासाठी थांबू नका आणि मौल्यवान दागिने सुरक्षित ठेवा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
दुचाकीवरील तरुणाला रस्त्यात थांबवलं; आधी पत्ता विचारला अन् मग कांड, पुण्यातील फुरसुंगी भागात काय घडलं?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement