advertisement

Panvel News : तो भीषण आवाज आला अन् सगळं शांत झालं; पनवेलमध्ये एकाच घरातील दोघांचा दुर्देवी मृत्यू

Last Updated:

New Panvel Accident : नवीन पनवेल येथे रिक्षा आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर एक महिला आणि लहान मुलगी जखमी झाली. हा अपघात पहाटे चिंचवण येथे घडला.

Two Killed in Rickshaw-Container Accident in New Panvel
Two Killed in Rickshaw-Container Accident in New Panvel
नवी मुंबई : नवीन पनवेल परिसरात रिक्षा आणि कंटेनरच्या भीषण अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात शुक्रवारी पहाटे चिंचवण येथील विठ्ठल कामत हॉटेलजवळ झाला. या अपघातात रफिक अन्सारी (वय 40) आणि फातिमा अन्सारी (वय 20) यांचा जागीच मृत्यू झाला.
रिक्षाची कंटेनरला भीषण धडक
मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेली ही दोघेही मुंब्रा येथील रहिवाशी होते. त्या दिवशी रिक्षा चालकासह चौघेजण रिक्षातून पेणच्या दिशेने प्रवास करत होते. पहाटेच्या सुमारास चिंचवण परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला रिक्षा जोरात धडकली. धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला.
दोन प्रवाशांचा जागीच अंत
या अपघातात रफिक अन्सारी आणि फातिमा अन्सारी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रिक्षामधील आणखी एक महिला आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. रस्त्यावर कंटेनर उभा असण्यामुळे अपघात झाला का याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Panvel News : तो भीषण आवाज आला अन् सगळं शांत झालं; पनवेलमध्ये एकाच घरातील दोघांचा दुर्देवी मृत्यू
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement