Pune Crime : कुख्यात गुंड गजा मारणेचा 'शार्प शूटर' वारजेतून पोलिसांच्या ताब्यात, मध्यरात्री काय घडलं?

Last Updated:

Gaja Marne sharp shooter Sunil Bansode arrested : पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे टोळीतील गुंड सुनील बनसोडे याला कोथरूड पोलिसांनी मध्यरात्री वारजे माळवाडी परिसरातून ताब्यात घेतले आहे

Gaja Marne sharp shooter Sunil Bansode arrested
Gaja Marne sharp shooter Sunil Bansode arrested
Pune Crime News (अभिजीत पोटे, पुणे प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गँगवॉरने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दोन दिवसापूर्वी कोंढव्यात गणेश काळेची हत्या झाल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता पुण्यातील प्रमुख रस्त्यापैकी एक असलेल्या बाजीराव रोडवर एका तरुणाची कोयत्याने माया टोळीने हत्या केली. अशातच आता पुण्यातील गँगवॉर पुन्हा भडकताना दिसत आहे. अशातच काल रात्री पुणे पोलिसांना मोठं यश मिळालं. काल मध्यरात्री पुणे पोलिसांनी गजा मारणे टोळीला धक्का दिला.

गजा मारणे टोळीतील गुंड सुनील बनसोडे ताब्यात 

पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे टोळीतील गुंड सुनील बनसोडे याला कोथरूड पोलिसांनी मध्यरात्री वारजे माळवाडी परिसरातून ताब्यात घेतले आहे. बनसोडे याच्या विरोधात मोका (MCOCA) सह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता. अशातच काल पोलिसांनी सुनील बनसोडे याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
advertisement

गजा मारणे टोळीचा 'शार्प शूटर'

सुनील बनसोडे याची ओळख गजा मारणे टोळीतील 'शार्प शूटर' म्हणून आहे. मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर छापा टाकत त्याला अटक केली. अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या या गुंडाला ताब्यात घेणे, हे पुणे पोलिसांसाठी एक महत्त्वाचे यश मानले जात आहे. सुनील बनसोडे या पुण्यात कोणता प्लॅन होता का? असा सवाल देखील विचारला जात आहे. पोलीस आता सुनील बनसोडेची चौकशी करत आहेत.
advertisement

गजा मारणे सांगलीतील जिल्हा कारागृहात

दरम्यान, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ मंत्र्यांच्या कार्यालयातील एकाला मारहाण प्रकरणात अटक करून मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला सांगलीतील जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आलं होतं. या प्रकरणात रुपेश मारणे आणि गजा मारणे या दोघांना देखील पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपी केलं होतं. त्यानंतर गजा मारणे याला सांगली कारागृहात पाठवल्याने पुण्यातील गँगवॉर संपेल, अशी शक्यता होती. मात्र, पुण्यातील गँगवॉर आंदेकर टोळीच्या करारनाम्यानंतर आणखी भडकल्याचं पहायला मिळतंय.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : कुख्यात गुंड गजा मारणेचा 'शार्प शूटर' वारजेतून पोलिसांच्या ताब्यात, मध्यरात्री काय घडलं?
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement