advertisement

पुण्यात चाललंय काय? बुलेटच्या कर्णकर्कश हॉर्नला विरोध करणं पडलं महागात; ज्येष्ठासोबत टोळक्याचं धक्कादायक कृत्य

Last Updated:

केवळ हॉर्न वाजवण्याबाबत विचारणा केली म्हणून बुलेट चालक आणि त्याच्या साथीदारांनी एका ज्येष्ठ नागरिकाला क्रिकेटच्या बॅटने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बुलेट चालकाकडून ज्येष्ठाला बेदम मारहाण (AI Image)
बुलेट चालकाकडून ज्येष्ठाला बेदम मारहाण (AI Image)
पुणे: शहरात बुलेटच्या सायलेन्सरमधून येणाऱ्या आवाजाचा आणि कर्णकर्कश हॉर्नचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतच असतो. मात्र, आता या त्रासाबाबत जाब विचारणं एका ज्येष्ठाला महागात पडलं आहे. केवळ हॉर्न वाजवण्याबाबत विचारणा केली म्हणून बुलेट चालक आणि त्याच्या साथीदारांनी एका ज्येष्ठ नागरिकाला क्रिकेटच्या बॅटने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वारगेट येथील महर्षीनगर भागात हा प्रकार घडला.
नेमकं काय घडलं?
तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे महर्षीनगरमधील एका सोसायटीत वास्तव्यास आहेत. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास एक आरोपी आपल्या बुलेटवरून सोसायटीच्या आवारात आला. त्याने विनाकारण बुलेटचा कानठळ्या बसवणारा हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. या आवाजाचा त्रास झाल्याने ज्येष्ठाने त्याला विचारणा केली. याचा राग मनात धरून आरोपीने सुरुवातीला शिवीगाळ केली आणि नंतर आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. या टोळक्याने ज्येष्ठ नागरिकावर बॅटने हल्ला चढवला आणि त्यांना शारीरिक इजा केली.
advertisement
याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ अधिक तपास करत आहेत. विशेष म्हणजे, पुणे पोलिसांनी नुकतीच शहरातील १५० हून अधिक बुलेट चालकांवर सायलेन्सरमध्ये फेरफार केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालवणे आणि मोठे आवाज काढणाऱ्या दुचाकीस्वारांवर जप्तीची मोहीम सुरू असतानाच ही घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
advertisement
रात्री-अपरात्री आवाज करून नागरिकांची झोपमोड करणाऱ्या आणि दहशत माजवणाऱ्या अशा बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात चाललंय काय? बुलेटच्या कर्णकर्कश हॉर्नला विरोध करणं पडलं महागात; ज्येष्ठासोबत टोळक्याचं धक्कादायक कृत्य
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement