advertisement

पुणे हादरलं! आईनं आपल्या मित्रासोबत लेकीला शाळेत पाठवलं; वारजेतील 'त्या' निर्मनुष्य रस्त्यावर नेत त्यानं केलं धक्कादायक कांड

Last Updated:

नराधम ज्ञानेश्वरने तिला शाळेत न नेता वारजे येथील डीपी रोडवर नेले. निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवून त्याने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार (AI Image)
अल्पवयीन मुलीवर अत्याचार (AI Image)
पुणे : पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी आणखी एक घटना समोर आली आहे. ज्या व्यक्तीवर आईने आपल्या काळजाच्या तुकड्याला शाळेत सोडण्याची जबाबदारी विश्वासाने सोपवली, त्याच नराधम मित्राने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या धक्कादायक प्रकरणी वारजे पोलिसांनी ज्ञानेश्वर रायरीकर (वय २९) याला बेड्या ठोकल्या असून, त्याच्यावर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
विश्वासाचा केला घात
पीडित मुलीची आई विधवा असून, ती आणि आरोपी ज्ञानेश्वर हे मागील अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र होते. ओळखीमुळे आईचा ज्ञानेश्वरवर पूर्ण विश्वास होता. गुरुवारी सकाळी मुलीने ज्ञानेश्वरला शाळेत सोडण्यासाठी बोलावले. आईनेही विश्वासाने लेकीला त्याच्यासोबत पाठवले. मात्र, नराधम ज्ञानेश्वरने तिला शाळेत न नेता वारजे येथील डीपी रोडवर नेले. निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवून त्याने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला.
advertisement
'अर्ध्या तासाचा उशीर' अन् फुटलं भांडं
मुलीची शाळा सकाळी ७ वाजता होती, मात्र ती साडेसात वाजता पोहोचली. घरी आल्यावर आईने तिला या अर्ध्या तासाच्या विलंबाबाबत विचारणा केली. आईने विचारताच मुलगी प्रचंड घाबरली आणि तिची अवस्था पाहून आईचा संशय बळावला. अखेर विश्वासात घेऊन विचारल्यावर मुलीने आपल्यासोबत घडलेला विदारक प्रसंग सांगितला. आईने क्षणाचाही विलंब न लावता वारजे पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.
advertisement
पोलिसांची तत्परता
वारजे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास चक्रे फिरवली आणि आरोपी ज्ञानेश्वर रायरीकर याला अटक केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, ओळखीच्याच व्यक्तींकडून होणाऱ्या अशा कृत्यांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! आईनं आपल्या मित्रासोबत लेकीला शाळेत पाठवलं; वारजेतील 'त्या' निर्मनुष्य रस्त्यावर नेत त्यानं केलं धक्कादायक कांड
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement