advertisement

पतीचा शारीरिक संबंधाला नकार; पत्नीची थेट कोर्टात धाव, काहीच दिवसात संपला पुण्यातील उच्चशिक्षित जोडप्याचा 'संसार'

Last Updated:

लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहून कोमल सासरी आली. मात्र पती अक्षय सातत्याने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास टाळाटाळ करत असल्याचे तिच्या निदर्शनास आले.

उच्चशिक्षित जोडप्याचं लग्न रद्द (AI Image)
उच्चशिक्षित जोडप्याचं लग्न रद्द (AI Image)
पुणे: विवाहानंतर पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित न होणे हे लग्न रद्द करण्यासाठी ठोस कारण ठरू शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल पुणे कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. प्रतिवादी पतीने आपली चूक मान्य केल्यामुळे न्यायालयाने दीर्घ सुनावणी टाळून अत्यंत संक्षिप्त प्रक्रियेद्वारे हा विवाह रद्द करण्याचा आदेश दिला.
नेमकं प्रकरण काय?
कोमल आणि अक्षय (नावं बदललेली) हे दोन्ही उच्चशिक्षित तरुण-तरुणी नातेवाईकांच्या मध्यस्थीने विवाहबंधनात अडकले होते. त्यांनी नोंदणीकृत पद्धतीने विवाह केला. लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहून कोमल सासरी आली. मात्र पती अक्षय सातत्याने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास टाळाटाळ करत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. वारंवार प्रयत्न करूनही पतीचा प्रतिसाद मिळत नसल्याने आणि त्याला संसारात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर कोमल माहेरी परतली.
advertisement
न्यायालयाने दिला त्वरित दिलासा
शारीरिक संबंध प्रस्थापित न झाल्याच्या कारणावरून कोमलने कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन प्रक्रियेत पती अक्षयने कोणतीही ओढाताण न करता लेखी स्वरूपात बिनशर्त कबुली दिली की, "आमच्यामध्ये कोणतेही शारीरिक संबंध प्रस्थापित झालेले नाहीत." हिंदू विवाह कायद्यातील तरतुदींनुसार, जर प्रतिवादीने स्वतःहून कबुली दिली असेल आणि तथ्यांमध्ये वाद नसेल, तर साक्ष किंवा पुराव्यांची दीर्घ प्रक्रिया न राबवता निर्णय दिला जाऊ शकतो.
advertisement
न्यायालयीन वेळ आणि मानसिक ताण वाचला
न्यायाधीश बी. डी. कदम यांनी कायद्याचा हा प्रभावी वापर करत त्वरित निकाल दिला. कोमलच्या बाजूने ॲड. धनंजय जोशी आणि ॲड. प्रतीक दाते यांनी काम पाहिले, तर पतीच्या बाजूने ॲड. स्मिता देशपांडे यांनी सहकार्य केले. या जलद निकालामुळे दोन्ही पक्षांचा मानसिक ताण कमी झाला असून सामाजिक आणि कायदेशीर नुकसान टाळता आले.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पतीचा शारीरिक संबंधाला नकार; पत्नीची थेट कोर्टात धाव, काहीच दिवसात संपला पुण्यातील उच्चशिक्षित जोडप्याचा 'संसार'
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement