Pune Crime: 'तिच्यासोबतचे प्रेमसंबंध तोड'; प्रवीणनं त्या तरुणाचं ऐकलं नाही अन् पुण्यात भयानक घडलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
प्रवीण हा तरुण एका खाजगी कंपनीत कामाला असून त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध आहेत. याच तरुणीवरून मुख्य आरोपी महेश सरोदे याने प्रवीणला वारंवार धमकावले होते.
पुणे : पुणे शहरात प्रेमसंबंधांच्या वादातून एका २४ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मुंढवा परिसरात घडली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या असून, त्याच्या इतर तीन साथीदारांचा शोध सुरू आहे.
नेमकी घटना काय?
प्रवीण धनंजय माने (वय २४, रा. शेवाळवाडी) हा तरुण एका खाजगी कंपनीत कामाला असून त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध आहेत. याच तरुणीवरून मुख्य आरोपी महेश सरोदे (वय ३५) याने प्रवीणला वारंवार धमकावले होते. प्रवीणने त्या तरुणीशी संबंध तोडावेत, असा सरोदेचा आग्रह होता. मात्र, प्रवीणने त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या सरोदेने कट रचून त्याला मुंढवा येथे चर्चेच्या बहाण्याने बोलावून घेतले.
advertisement
प्रवीण मुंढव्यात पोहोचल्यानंतर सरोदे आणि त्याच्या इतर चार साथीदारांनी त्याला घेराव घातला. सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्यानंतर, आरोपींनी प्रवीणवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रवीणला पोलिसांकडे न जाण्याची धमकी देऊन आरोपी तिथून पसार झाले.
advertisement
मुंढवा पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच जखमी प्रवीणला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी खुनाचा प्रयत्न (IPC 307) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपी महेश सरोदेला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक एस. पिंगुवाले पुढील तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 1:54 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: 'तिच्यासोबतचे प्रेमसंबंध तोड'; प्रवीणनं त्या तरुणाचं ऐकलं नाही अन् पुण्यात भयानक घडलं






