advertisement

तुम्हालाही घर सजवायला आवडतं? थांबा! पुणेकर तरुणासोबत घडलेली ही घटना वाचून धक्काच बसेल

Last Updated:

प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं घर सुंदर असावं, सजवलेलं असावं. पण घराच्या सजावटीची हीच ओढ पुण्यातील एका तरुणाला तब्बल ८ लाख १० हजार रुपयांना पडली आहे.

घराच्या सजावटीची हौस पडली महागात (AI Image)
घराच्या सजावटीची हौस पडली महागात (AI Image)
पुणे: प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं घर सुंदर असावं, सजवलेलं असावं. पण घराच्या सजावटीची हीच ओढ पुण्यातील एका तरुणाला तब्बल ८ लाख १० हजार रुपयांना पडली आहे. सोशल मीडियावरील एका जाहिरातीच्या मोहात पडून हा तरुण सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकला आणि पाहता पाहता त्याच्या कष्टाची कमाई लंपास करण्यात आली.
स्वस्त सजावटीचे 'महागडे' आमिष
मुंढवा परिसरातील केशवनगरमध्ये राहणाऱ्या या तरुणाने गेल्या वर्षी आपल्या घराच्या सजावटीसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. हीच संधी साधून सायबर चोरट्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. "आम्ही तुम्हाला अत्यंत स्वस्त दरात आणि आकर्षक पद्धतीने गृहसजावट करून देऊ," अशी बतावणी चोरट्यांनी केली.
अशी झाली फसवणूक
चोरट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणाने त्यांच्याशी व्यवहार निश्चित केला. सुरुवातीला काही पैसे आगाऊ म्हणून मागितले गेले. त्यानंतर चोरट्यांनी विविध कारणे सांगून तरुणाकडून वेळोवेळी पैसे उकळण्यास सुरुवात केली. घराचं स्वप्न साकार होईल या आशेने तरुणाने तब्बल ८ लाख १० हजार रुपये चोरट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात जमा केले. मात्र, पैसे घेऊनही कामाला सुरुवात करण्याऐवजी चोरटे टाळाटाळ करू लागले. संशय आल्याने तरुणाने चौकशी केली असता, त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ज्यांनी स्वस्त सजावटीचे स्वप्न दाखवले होते, त्यांनी प्रत्यक्षात तरुणाला आर्थिक गर्तेत लोटले होते.
advertisement
मुंढवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशा कोणत्याही घटनांपासून वाचण्यासाठी तुम्ही सोशल मीडियावरील कोणत्याही जाहिरातीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी संबंधित कंपनीच्या ऑफिसला प्रत्यक्ष भेट द्या. प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय मोठी रक्कम आगाऊ स्वरूपात देऊ नका. तुमच्या एका चुकीच्या क्लिकमुळे किंवा चुकीच्या निर्णयामुळे तुमच्या बँक खात्यावर डल्ला मारला जाऊ शकतो. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना कायम सतर्क राहा.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
तुम्हालाही घर सजवायला आवडतं? थांबा! पुणेकर तरुणासोबत घडलेली ही घटना वाचून धक्काच बसेल
Next Article
advertisement
Mumbai News: मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक
मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलि
  • माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना

  • कांदिवली परिसरात एका मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

  • समता नगर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे.

View All
advertisement