Pune : विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, अलका चौकात नेमकं काय घडलं? पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Ganpati Visarjan Miravnuk : अलका चौक परिसरात दोन गट पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील असताना वादवादी झाली अन् पुढे हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Pune News (अभिजीत पोटे, प्रतिनिधी) : गणपती बाप्पा मोरया म्हणत भाविकांनी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रसिद्ध असले ती पुण्यातील विसर्जन मिरवणुका... पुण्यातील विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी परदेशातून देखील भाविक पुण्यात दाखल होतात. अशातच आता पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला गालगोट लावण्याचा प्रकार समोर आली आहे. पुण्यातील सर्वात मोठं हॉटस्पॉट असणाऱ्या अलका चौकात तरुणांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक लक्ष्मी रोड, बाजीराव रोड आणि तिळक रोड परिसरात दाखल होत असतात. अशातच मुंग्यांना सुद्धा जागा मिळणार नाही, एवढी तुफान गर्दी असते. अशातच अलका चौक परिसरात दोन गट पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील असताना वादवादी झाली अन् पुढे हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांसमोर हा प्रकार घडला.
advertisement
पोलीस अधिकारी तातडीने पोहोचला अन्
शिवमुद्रा वाद्यपथक वादन करत असताना ही घटना घडली. तिळक रोड आणि लक्ष्मी रोड परिसरातील चौकात ही घटना घडली. अखेर एक पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचला अन् मध्यस्थीने वाद थांबला. मात्र, याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पाहा Video
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये बाचाबाची अन् हाणामारी #Pune #GaneshChaturthi pic.twitter.com/KEHjx5QOtI
— News18Lokmat (@News18lokmat) September 7, 2025
advertisement
दरम्यान, हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती 3 वाजता अलका टॉकीज चौकात दाखल झाला.. भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या विसर्जन मिरवणूक पारंपारिक रथातून काढण्यात आली.. अलका टॉकीज चौकातून भंडाऱ्याची उधळण आणि अतिशबाजी करत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला निरोप देण्यात आला तर 3 वाजून 51 मिनिटांनी रंगारी गणपतीच विसर्जन पार पडलं.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 07, 2025 7:33 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, अलका चौकात नेमकं काय घडलं? पाहा Video