advertisement

Weather Alert: मुंबई, ठाण्यात 24 तास पावसाचे, रविवारी पुन्हा अलर्ट, कोकणचा हवामान अंदाज

Last Updated:
Mumbai Rain: कोकणात पावसाचा जोर कायम आहे. आज मुंबईसह ठाणे परिसरात जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
1/5
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसाच्या सरी अधूनमधून कोसळताना दिसत आहेत. हवामान विभागाने आजदेखील विविध जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी हलक्या सरींचा अनुभव येणार असला तरी काही भागात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली गेली आहे.

2/5
मुंबईत आज काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून शहराला यलो अलर्ट जारी केला आहे. अधूनमधून रिमझिम ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. किमान तापमान 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा वेग 18-20 किमी प्रतितास इतका असण्याचा अंदाज आहे.

3/5
नवी मुंबई व ठाणे या दोन्ही भागांमध्येही आज यलो अलर्ट राहणार आहे. सकाळी रिमझिम पावसाच्या सरी आणि दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस असेल. वारे 20-22 किमी प्रतितास वेगाने वाहतील.

4/5
पालघर जिल्ह्याला आज सलग तिसऱ्या दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सकाळपासूनच मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कमाल तापमान 29 अंश तर किमान तापमान 24 अंश राहील. वाऱ्याचा वेग 25 -30 किमी प्रतितास राहणार आहे.

5/5
रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना कोणताही मोठा अलर्ट नसला तरी अधूनमधून पावसाच्या सरी पडतील. पण रत्नागिरी जिल्ह्यालाही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. सकाळी हलक्या सरी तर दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील

SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement