Pune Hubli Vande Bharat : पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसचे स्टॉप, वेळ अन् तिकीट दर किती? ए टू झेड माहिती
- Published by:Shreyas
Last Updated:
महाराष्ट्राला आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुणे- हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
पुणे : महाराष्ट्राला आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुणे- हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. पुणे-हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस चालवता येणार आहे. 19 सप्टेंबरपासून ही ट्रेन धावणार आहे. पुणे ते हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस गुरूवार, शनिवार आणि सोमवारी धावेल. पुणे स्टेशनवरून दुपारी 2.15 वाजता वंदे भारत ट्रेन रवाना होईल तर त्याच दिवशी रात्री 10.45 वाजता ट्रेन हुबळीला पोहोचेल.
दुसरीकडे हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस बुधवार, शुक्रवार आणि रविवारी धावेल. ही ट्रेन 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस हुबळीवरून पहाटे 5 वाजता सुटेल तर दुपारी 1.30 वाजता ट्रेन पुण्यात पोहोचेल.
कुठे थांबणार वंदे भारत?
पुणे-हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस पुणे, सातारा, सांगली, मिरज, बेळगाव, धारवाड आणि हुबळी या स्टेशनवर थांबेल.
advertisement
वंदे भारत एक्स्प्रेसची वेळ
पुण्याहून दुपारी 1.30 वाजता निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस साताऱ्याला संध्याकाळी 4.37 वाजता, सांगलीला संध्याकाळी 6.10 वाजता, मिरजला संध्याकाळी 6.40 वाजता, बेळगावला रात्री 8.35 वाजता, धारवाडला रात्री 10.20 वाजता आणि हुबळीला रात्री रात्री 10.45 वाजता पोहोचेल.
हुबळीवरून वंदे भारत एक्स्प्रेस पहाटे 5 वाजता सुटेल, 5 वाजून 17 मिनिटांनी ट्रेन धारवाडला थांबेल. यानंतर बेळगावला सकाळी 7 वाजता, मिरजला सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी, सांगलीला सकाळी 9 वाजून 17 मिनिटांनी, साताऱ्याला सकाळी 10.50 मिनिटांनी ट्रेनला थांबा देण्यात आला आहे. साताऱ्यानंतर निघालेली ट्रेन थेट पुण्यात दुपारी 1.30 वाजता येऊन थांबेल.
advertisement
तिकीट किती?
वंदे भारत एक्स्प्रेसला 8 डबे असणार आहेत. या ट्रेनमध्ये चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास अशा दोन प्रकारचे डबे असतील.
एक्झिक्युटिव्ह क्लासचं तिकीट
पुणे ते हुबळी एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये जेवणासह तिकीट 2,780 रुपये तर जेवणाशिवाय 2,385 रुपये असेल. तर पुणे ते धारवाड जेवणासोबत 2,725 आणि जेवणाशिवाय 2,325 रुपये एवढे दर ठेवण्यात आले आहेत. पुणे ते बेळगाव जेवणासोबत 2,290 आणि जेवणाशिवाय 1,890 रुपये. पुणे ते सांगली जेवणासोबत 1,690 तर जेवणाशिवाय 1430 रुपये द्यावे लागतील.
advertisement
चेअर कारचं तिकीट
पुणे ते हुबळी जेवणासह 1,530 रुपये आणि जेवणाशिवाय 1,185 रुपये. पुणे ते धारवाड जेवणासह 1,505 तर जेवणाशिवाय 1,160 रुपये. पुणे ते बेळगाव जेवणासह 1,295 आणि जेवणाशिवाय 955 रुपये, पुणे ते सांगली जेवणासह 965 आणि जेवणाशिवाय 730 रुपये असे तिकीट दर ठेवण्यात आले आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 16, 2024 6:06 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Hubli Vande Bharat : पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसचे स्टॉप, वेळ अन् तिकीट दर किती? ए टू झेड माहिती