कधी महादेवाचा अवतार सांगत, कधी गुंगीचं औषध देत पुण्यातील महिलेवर अत्याचार; आता पसार झाला वसईचा भोंदूबाबा ऋषिकेश, पथकं रवाना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
नाशिकच्या खरात प्रकरणाची बातमी वाचल्यानंतर पीडित महिलेने हिंमत एकवटली आणि पोलिसांकडे धाव घेतली. सध्या आरोपी ऋषिकेश वैद्य पसार असून, पुणे आणि वसई पोलिसांची पथके त्याच्या मागावर आहेत.
पुणे : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्र हादरलेला असतानाच, नुकतंच आणखी एका भोंदू बाबाचे घृणास्पद कृत्य समोर आले आहे. स्वतःला 'महादेवाचा अवतार' म्हणवून घेणाऱ्या आणि दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या ऋषिकेश वैद्य या भोंदूने एका ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वसईच्या माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तो आता तपासासाठी पुण्यातील मांजरी (हडपसर) पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी गुन्हा दाखल होताच हा बाबा आता फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२३ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून पीडित महिलेची ओळख वसईतील ऋषिकेश वैद्यशी झाली होती. पीडित महिला धार्मिक प्रवृत्तीची असल्याने ऋषिकेशने तिला 'ईश्वराची उपासना कशी करायची' याचे तंत्र शिकवण्याचे आमिष दाखवले. २०२३ मध्ये तो पुण्यात आला आणि मांजरी परिसरात त्याने महिलेला गाठले. तिथे तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही, तर त्यानंतर त्याने महिलेला वसईला बोलावून तिथेही वारंवार अत्याचार केले.
advertisement
पोलीस पथके रवाना
नाशिकच्या खरात प्रकरणाची बातमी वाचल्यानंतर पीडित महिलेने हिंमत एकवटली आणि पोलिसांकडे धाव घेतली. सध्या आरोपी ऋषिकेश वैद्य पसार असून, पुणे आणि वसई पोलिसांची पथके त्याच्या मागावर आहेत. या भोंदूने अशाच प्रकारे आणखी काही महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी आवाहन केले आहे की, "जर अशा प्रकारे कुणाची फसवणूक किंवा अत्याचार झाला असेल, तर त्यांनी न घाबरता पुणे पोलिसांकडे तक्रार द्यावी."
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 9:21 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
कधी महादेवाचा अवतार सांगत, कधी गुंगीचं औषध देत पुण्यातील महिलेवर अत्याचार; आता पसार झाला वसईचा भोंदूबाबा ऋषिकेश, पथकं रवाना








