advertisement

मावळात 5 वर्षाची चिमुकली 18 तास बेपत्ता, पोलिसांना झाडा-झुडपात भयंकर आढळलं; नेमकं काय घडलं?

Last Updated:

पीडित मुलीचे आईवडील शिरगावमधील एका खेळणी बनविणाऱ्या कारखान्यात मोल मजुरी करतात.

News18
News18
पुणे :  मावळ तालुक्यातिल शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज धक्कादायक घटना समोर आली आहे. राहत्या घरापासून बेपत्ता झालेल्या 5 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला आहे . शिरगाव येथे घराबाहेर खेळणाऱ्या मुलीला नराधमाने चॉकलेटचे अमिष देऊन काल सायंकाळच्या सुमारास घरापासून काही अंतरावर नेले आणि तिच्यावर अत्याचार करत करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह झाडाझुडपात टाकून आरोपीने घटना स्थळावरून पळ काढला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार , पीडित मुलीचे आईवडील शिरगावमधील एका खेळणी बनविणाऱ्या कारखान्यात मोल मजुरी करतात. कामावरून सांयकाळी पती पत्नी घरी आल्यावर आपली मुलगी न दिसल्याने परीसरात मुलीला शोध घेण्यास सुरुवात केली केली. तसेच संबंधित घटना शिरगाव पोलीस ठाण्यात कळवली. पोलीस ग्रामस्थ तसेच नातेवाईकांनी रात्रभर मुलीचा शोध घेतला परंतु मुलगी मिळून आली नाही
advertisement
रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पीडित चिमुकल्या मुलीचा मृतदेह घरापासून काही अंतर लांब असलेल्या झाडाझुडपात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता पीडित मुलीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. घटनास्थळाची पाहणी करत पोलिसांनी मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू 

advertisement
घटनेचा अधिक तपास करत असताना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला. संशयित आरोपी समीर मंडल हा पीडित मुलीला आपल्या सोबत घेऊन जातानाचा दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधित व्यक्तीने मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याते समोर आले आहे. 35 वर्षीय समीर मंडल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे घटनेचा अधिक तपास शिरगाव पोलीस करत आहेत
view comments
मराठी बातम्या/पुणे/
मावळात 5 वर्षाची चिमुकली 18 तास बेपत्ता, पोलिसांना झाडा-झुडपात भयंकर आढळलं; नेमकं काय घडलं?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement