Pune Metro 3: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग 3 केव्हापासून सुरू होणार? समोर आली मोठी अपडेट

Last Updated:

पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर हा 23 किलोमीटरचा टप्पा लवकरच नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे. याची अपडेट आता समोर आली आहे.

Pune Metro 3: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग 3 केव्हापासून सुरू होणार? समोर आली मोठी अपडेट
Pune Metro 3: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग 3 केव्हापासून सुरू होणार? समोर आली मोठी अपडेट
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकर ज्या वेळेची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो क्षण येऊन ठेपला आहे. पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर हा 23 किलोमीटरचा टप्पा आता लवकरच नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे. मेट्रो मार्ग 3ची गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकर वाट पाहत होते. मार्च 2026 पासून हिंजवडी ते शिवाजीनगर हा 23 किलोमीटरचा मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. हा मोठा टप्पा प्रवाशांसाठी आता लवकरच खुला होणार आहे. प्रवाशांकरिता मेट्रो मार्ग सुरू करण्याचा आता अखेर मार्ग मोकळा झाला आहे.
यापूर्वी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (PMRDA) 'माण ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक' (आचार्य आनंदऋषीजी चौक) दरम्यानचा 19 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाची यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग पुण्यातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक आहे. हा 23 किलोमीटरचा मार्ग आपल्याला पुणे शहरासोबतच काही ग्रामीण भागामधूनही ती धावते. प्रामुख्याने या मेट्रोचा सर्वाधिक वापर नोकरदार वर्गाला होणार आहे. हिंजवडीमध्ये अनेक आयटी कंपन्या आहेत. मेट्रो मार्ग 3 च्या कामाला नोव्हेंबर 2021 पासून सुरुवात झाली होती. या मार्गाचे काम आता पूर्ण झाले असून काही मेट्रो स्टेशनचे काम अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले आहे.
advertisement
23 किलोमीटर असलेल्या मार्गावर याआधीच 19 किलोमीटर मार्गावर मेट्रोची चाचणी झालेली आहे. त्यापैकी उर्वरित 5 किलोमीटरच्या टप्प्याचे काम आता बाकी असून ते लवकरात लवकर पूर्ण करून हा मार्ग मार्च 2026 पर्यंत सुरू करण्याचे पीएमआरडीएचे उद्दिष्ट आहे. 23 किलोमीटर असलेल्या मेट्रो मार्ग 3वर एकूण 23 स्थानक असणार आहेत. त्यामध्ये, मेगापॉलिस सर्कल, एम्बेसी क्वाड्रोन बिजनेस पार्क, डोहलेर, इन्फोसिस फेज 2, विप्रो फेज 2, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, एनआयसीएमएआर, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, कृषी अनुसंधान, सकाळ नगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आरबीआय, ॲग्रिकल्चर कॉलेज, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट या स्थानकांचा समावेश आहे.
advertisement
ऑफिसेस असणाऱ्या अनेक भागांमध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होताना दिसते. त्यामुळे आता नोकरदारांचा वाहतूक कोंडीतून प्रवास कायमचा बंद होणार आहे. कायमची वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठीच मेट्रो मार्ग 3 चे नियोजन करण्यात आले होते. हिंजवडीला पुण्याच्या मध्यवर्ती भागी असलेल्या शिवाजीनगरपर्यंत मेट्रो कनेक्टिव्हिटीने जोडण्याचा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) निर्णय घेतला होता. सार्वजनिक- खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राबविण्यात येणारा हा पहिला देशातील पहिला प्रकल्प असून त्याच्या निर्मितीसाठी 8313 कोटी इतका खर्च लागल्याची माहिती मिळत आहे. मेट्रोमुळे प्रदूषण कमी होणार असून रस्त्यांवर होणार्‍या वाहन अपघातांना आणि वाहतूक कोंडीला सुद्धा आळा बसणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro 3: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग 3 केव्हापासून सुरू होणार? समोर आली मोठी अपडेट
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement