advertisement

PMC Result 2026 : पुण्याचा पहिला निकाल जाहीर! राष्ट्रवादीने खातं उघडलं; प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपची 'बादशाहत'

Last Updated:

Pune Municipal Corporation Election 2026 first Result : पुणे महापालिका निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. प्रभाग क्रमांक २० मध्ये भाजपचे वर्चस्व पहायला मिळालं तर राष्ट्रवादीच्या गौरव घुलै यांनी विजय मिळवलाय.

News18
News18
Pune PMC Election Result Warn No 20 : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असतानाच प्रभाग क्रमांक २० शंकर महाराज मठ, बिबेवाडी येथील चित्र स्पष्ट झाले आहे. या प्रभागातून भारतीय जनता पक्षचे तीन उमेदवार विजयी झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही एक उमेदवार यशस्वी ठरला आहे.
भाजपकडून राजेंद्र शिळीमकर, तन्वी दिवेकर आणि मानसी देशपांडे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव घुले यांनी भाजपचे महेंद्र शिंदे यांचा पराभव करत आपली जागा कायम राखली. घुले यांच्या विजयामुळे प्रभागात राष्ट्रवादीची उपस्थिती टिकून राहिली. गौरव घुले यांनी भाजपचे महेंद्र सुंदेचा यांचा पराभव केला आहे.
तसेच पुण्यात काँग्रेसने खातं उघडलं असून प्रभाग क्रमांक 18 मधून साहिल केदारी यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे आता पुण्याची लढत अधिक चुरशीची झाली आहे.
advertisement
दरम्यान, पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल नऊ वर्षांनंतर शहरवासीयांना आपला कौल देण्याची संधी मिळाली आहे. शहरातील ४१ प्रभागांमधून एकूण १६५ नगरसेवक निवडून येणार आहेत. या निवडणुकीत चौरंगी सामना रंगला होता. महायुतीतील तीन पक्ष वेगळे लढत असल्याने स्पर्धा तीव्र झाली होती. अशातच आता कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार? असा सवाल विचारला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
PMC Result 2026 : पुण्याचा पहिला निकाल जाहीर! राष्ट्रवादीने खातं उघडलं; प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपची 'बादशाहत'
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement