इथे ना रस्ता आहे, ना कसली सुविधा, पुण्यातील धक्कादायक वास्तव; उपचारासाठी 2 किलोमीटर चिखल तुडवत पायपीट
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पक्का रस्ता नसल्यामुळे येथील आजारी, अबाल,वृद्धांना दवाखान्यात नेण्यासाठी अशाच प्रकारे झोळीत टाकून घऊन जावे लागत आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : एकीकडे शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करून. घरबसल्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगत आहे. मात्र त्याच दुसऱ्या बाजूला आजही राज्यातील अनेक भागातील आरोग्य व्यवस्था सलाईनवरच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान पुण्यातील भोरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रस्त्याअभावी एका वृद्ध महिलेला झोळीतून रुग्णालयात न्याव लागत असल्याचं घटना समोर आली आहे.
advertisement
पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भाग असलेल्या म्हसर बुद्रुकमधील राखीचामाळ धनगरवस्ती येथील घटना आहे. 92 वर्षाच्या सगाबाई विठ्ठल बर्गे यांना ताप, थंडी येऊन आजारी पडल्या.. परंतु रस्त्याची सोय नसल्यामुळे कुटुंबातील व्यक्तीने, ग्रामस्थांच्या मदतीने चादरीची झोळी करून 2 किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यावर आणून..तेथून खासगी वाहनाने त्यांना निगुडघर येथे उपचारासाठी त्यांना दाखल केले.
advertisement
2 किलोमीटर चिखल तुडवत पायपीट
गावातील धनगर वस्तीकडे जाणारा रस्ता कच्चा असल्यानं पावसाळ्यात वस्तीत कोणत्याही प्रकारचे वाहन जात नाही. वस्तीपर्यंत 2 किलोमीटर अंतर असल्यामुळे नागरिकांनी सदर वृद्ध महिलेला झोळीत ठेवून रिमझिम पावसात चिखल तुडवत आणावे लागले. पक्का रस्ता नसल्याने वृद्ध महिलेला झोळीत टाकून 2 किलोमीटर चिखल तुडवत पायपीट करत मुख्य रस्त्यावर पोहचल्यानंतर, तिथून पुन्हा खाजगी गाडीने काही वेळेचा प्रवास करत रुग्णालयात आणण्याची वेळ आली, त्यामुळं उपचार मिळण्यासही उशीर झाला. पक्का रस्ता नसल्यामुळे येथील आजारी, अबाल,वृद्धांना दवाखान्यात नेण्यासाठी अशाच प्रकारे झोळीत टाकून घऊन जावे लागत आहे.
advertisement
दर पावसळ्यात हीच परिस्थिती
रस्त्यासाठी निवेदन देऊनही प्रशासन लक्ष देत नसल्याने..वस्तीतील नागरिकांना पावसाळ्यात वारंवार अशा गोष्टींना तोंड द्यावे लागत असल्याने, नागरिकं नाराजी व्यक्त करतायत गावातील डोंगरात वसलेल्या या वस्तीवर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे..त्यामुळं दर पावसाळ्यात येथील रस्ता बंद होतो. त्यामुळे पावसाळ्यात दळणवळणाची सुविधा नसल्याने कोणीही आजारी पडल्यास रुग्णाला घेऊन पायपीट करावी लागते.. त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 23, 2025 9:17 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
इथे ना रस्ता आहे, ना कसली सुविधा, पुण्यातील धक्कादायक वास्तव; उपचारासाठी 2 किलोमीटर चिखल तुडवत पायपीट