Digestion : जेवणानंतरच्या पचनासाठी सोप्या टिप्स, या बिया करतील पचन सुकर

Last Updated:

दुपारच्या जेवणानंतर फिरायला जाणं शक्य नसेल, तर काही बिया चघळणं हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. यामुळे गॅस आणि अपचन होत नाही आणि पोट हलकं राहतं. त्यातले काही उपयुक्त पर्याय पाहूयात. 

News18
News18
मुंबई : दिनक्रम, आहारावर पचनक्रियेचं गणित अवलंबून असतं. तुमचा दिवस धावपळीचा असेल तर, ऑफिसला जायचं असेल तर या टिप्स नक्की लक्षात ठेवा. बहुतेक जण जेवणानंतर लगेचच खुर्चीवर बसतात. तासन्तास एकाच जागी बसल्यानं पचनक्रिया व्यवस्थित होत नाही, ज्यामुळे गॅस, अपचन, पोटफुगी आणि झोपेची समस्या उद्भवते.
दुपारच्या जेवणानंतर फिरायला जाणं शक्य नसेल, तर काही बिया चघळणं हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. यामुळे गॅस आणि अपचन होत नाही आणि पोट हलकं राहतं. त्यातले काही उपयुक्त पर्याय पाहूयात.
बडिशेप -
चालणं शक्य नसेल, तर काही बिया चघळणं हा एक सोपा आणि निरोगी मार्ग आहे. या बिया लहान वाटू शकतात, पण या बिया आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. दुपारच्या जेवणानंतर बडीशेप चघळणं ही भारतीय परंपरेतली प्रथा आहे. बडीशेपेच्या बियांमधे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, यामुळे गॅस  रोखले जातात आणि पचन जलद होतं. यातलं अ‍ॅनिथोल पाचक एंजाइम सक्रिय करतं, अन्नाचं जलद पचन करण्यासाठी याची मदत होते. मुख दुर्गंधी दूर करण्यासाठी देखील बडिशेप उपयुक्त आहे.
advertisement
ओवा - ओवा हा गॅस आणि अपचनावर रामबाण उपाय आहे. दुपारच्या जेवणानंतर जड वाटत असेल तर ओवा प्रभावी आहे. त्यातील थायमॉल घटक गॅस दूर करण्यासाठी आणि अपचन कमी करण्यासाठी मदत करते. चिमूटभर ओवा काळं मीठ घालून चावून कोमट पाणी प्यायल्यानं लगेच आराम मिळतो.
advertisement
तीळ - आतडी स्वच्छ करण्याचा तीळ हा नैसर्गिक मार्ग आहे. तीळाच्या बियांमधे भरपूर प्रमाणात फायबर असतं, जेवणानंतर तीळ खाल्ल्यानं बद्धकोष्ठता दूर होते आणि चयापचयाचा वेग वाढतो. विशेषतः हिवाळ्यात, तीळ शरीरातील उष्णता संतुलित करण्यासाठी आणि पोट हलकं वाटण्यासाठी उपयुक्त ठरतात.
advertisement
जवस - वजन कमी करणं आणि आतड्यांची साफसफाई करणं हे महत्त्वाचं काम करण्याचे गुणधर्म जवसात असतात.  जवसाच्या बियांमधे ओमेगा-३ फॅटी एसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. जेवणानंतर अर्धा चमचा जवस चघळल्यानं पोट साफ होण्यास मदत होतेच शिवाय पोटावरील चरबी हळूहळू कमी होते.
धणे - थंडावा देणारा आणि पोटफुगी कमी करण्यास मदत करणारा हा एक चांगला पर्याय. धणे पाचक एंजाइम संतुलित करतात. यामुळे पोटदुखी आणि छातीतली जळजळ कमी होते. उन्हाळ्यात धणे आणि बडीशेप एकत्र चघळणं अधिक फायदेशीर आहे, यामुळे शरीराला थंडावा मिळतो.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Digestion : जेवणानंतरच्या पचनासाठी सोप्या टिप्स, या बिया करतील पचन सुकर
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement