Weather Alert : महाराष्ट्रात बुधवारी वादळी पाऊस, 19 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
महाराष्ट्रात पावसाचा जोर अद्यापही कायम दिसून येत आहे. तसेच काही भागांत तापमानातही चढ उतार जाणवत आहे. 24 सप्टेंबर रोजीही राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
1/7
महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर अद्यापही कायम दिसून येत आहे. तसेच काही भागांत तापमानातही चढ-उतार जाणवत आहे. 24 सप्टेंबर रोजीही राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील तब्बल 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाहुयात 24 सप्टेंबर रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील.

advertisement
2/7
कोकण आणि मुंबई परिसरात पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड येथे विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाटमाथा आणि सोलापूर येथे विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच सातारा आणि कोल्हापूर घाटमाथा भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.

5/7
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक, नाशिक घाटमाथा तसेच अहिल्यानगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या तीन ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

6/7
विदर्भातील अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांत कुठलीही पावसाची शक्यता नाही. मात्र, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत मात्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

7/7
हवामान खात्याच्या या अंदाजानुसार, राज्यातील बहुतांश भागांत 24 सप्टेंबर रोजी ढगाळ वातावरण, पावसाच्या सरी आणि विजांचा कडकडाट अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी आणि नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

BJP vs Shiv Sena Ambernath : भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, अंबरनाथ नगर परिषदेत मोठी उलथापालथ, सगळा गेमच फिरला!
भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, गेमच फिरला अंबरनाथमध्ये उलथापाल
  • अंबरनाथ नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

  • शिवसेना शिंदे गटाची अंबरनाथमधून सत्ता उलथवण्यासाठी भाजपने जंग पछाडलं.

  • शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे भाजप पुरता घायाळ

View All
advertisement