पुण्यात फूड डिलिव्हरीसाठी निघालेल्या डिलिव्हरी बॉयला रस्त्यात अडवलं; डोक्यात घातला दगड, कारण धक्कादायक
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
फिर्यादी गणेश चौधरी हा फूड डिलिव्हरी देण्यासाठी जात होता. यावेळी तिघांनी त्याला रस्त्यात अडवले.
पुणे : पुण्यात किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीची आणखी एक धक्कादायक घटटना समोर आली आहे. यात पुण्यातील चिखली परिसरात एका १९ वर्षीय फूड डिलिव्हरी बॉयला जुन्या वादातून टोळक्याने बेदम मारहाण केली आहे. पिंगळे रस्त्यावर शुक्रवारी (९ जानेवारी) रात्री ही धक्कादायक घटना घडली.
नेमकी घटना काय?
फिर्यादी श्रीगणेश चौधरी (१९, रा. चिखली) हा फूड डिलिव्हरी देण्यासाठी जात होते. यावेळी रितेश गवते (२१), सोहम भोर (१९) आणि आदित्य आढांगळे (१९) या तिघांनी त्याला रस्त्यात अडवले. आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून गणेश याला जबरदस्तीने एका चहाच्या टपरीच्या मागे नेले.
'तू आमच्या घरच्यांबद्दल आणि आईबद्दल काय बोलला होतास?' अशी विचारणा करत आरोपींनी डिलिव्हरी बॉयला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर पुढे गंभीर मारहाणीत झाले. आरोपींनी गणेशला लाथाबुक्क्यांनी तुडवले. आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी त्याच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याला गंभीर जखमी केले.
advertisement
पोलिसात गुन्हा दाखल: या हल्ल्यानंतर जखमी गणेश यानी चिखली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरात अशा प्रकारच्या टोळक्यांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 9:44 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात फूड डिलिव्हरीसाठी निघालेल्या डिलिव्हरी बॉयला रस्त्यात अडवलं; डोक्यात घातला दगड, कारण धक्कादायक










