Kalyan : लोकलच्या गोंधळात घुमला नवजात बाळाचा आवाज अन् सगळ्यांच्या चेहऱ्यावर उमटलं हसू, गर्भवतीची डब्यातच प्रसूती

Last Updated:

Baby Born On Moving Local Train :अंबरनाथ ते कल्याण लोकलमध्ये प्रवास करत असताना एका महिलेला अचानक प्रसूती वेदना लागल्या. महिला पोलिस उपनिरीक्षक सोनाली नंदेश्वर आणि प्रवाशांच्या मदतीने डब्ब्यातच सुरक्षितपणे बाळाला जन्म दिला.

कल्याण ते अंबरनाथ रेल्वे प्रवासात महिलेची सुरक्षित प्रसूती 
कल्याण ते अंबरनाथ रेल्वे प्रवासात महिलेची सुरक्षित प्रसूती 
कल्याण : शनिवारी रात्री अंबरनाथ ते कल्याण दरम्यान प्रवास करत असलेल्या लोकल ट्रेनमध्ये एक गोंडस बाळाचा जन्म झाला. अंबरनाथहून कल्याणकडे जात असताना 23 वर्षीय अंजू काळे हिला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.
लोकलमध्ये प्रसूतीचा थरार
लोकल अंबरनाथ स्थानकात पोहोचल्यावर काही प्रवाशांनी तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली. ऑन-ड्युटी महिला पोलिस उपनिरीक्षक सोनाली नंदेश्वर यांनी परिस्थिती लगेच समजून लोकलमध्येच महिलेची सुरक्षित प्रसूती करण्याची तयारी केली. सर्व पुरुष प्रवाशांना उतरवण्यात आले आणि लोकलचे डब्बे बंद केले गेले.
अंबरनाथ लोकलमध्ये जन्मले गोंडस बाळ
लोकल डब्ब्यातच अंजू काळे हिला सुरक्षितपणे मुलगी जन्म दिली. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून प्रवाशांचे चेहरे आनंदाने भरले. ही घटना शनिवारी रात्री 8 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास घडली. अंजू काळे अंबरनाथमध्ये राहणारी असून काही कामानिमित्त कल्याणला गेली होती.
advertisement
महिला पोलिस उपनिरीक्षकांच्या धाडस आणि वेळीच केलेल्या कृतीमुळे ही प्रसूती सुरक्षितपणे झाली. प्रवाशांनीही या घटनेला साथ दिली आणि बाळाच्या जन्माचा आनंद सगळ्यांमध्ये पसरला.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan : लोकलच्या गोंधळात घुमला नवजात बाळाचा आवाज अन् सगळ्यांच्या चेहऱ्यावर उमटलं हसू, गर्भवतीची डब्यातच प्रसूती
Next Article
advertisement
BJP vs Shiv Sena Ambernath : भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, अंबरनाथ नगर परिषदेत मोठी उलथापालथ, सगळा गेमच फिरला!
भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, गेमच फिरला अंबरनाथमध्ये उलथापाल
  • अंबरनाथ नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

  • शिवसेना शिंदे गटाची अंबरनाथमधून सत्ता उलथवण्यासाठी भाजपने जंग पछाडलं.

  • शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे भाजप पुरता घायाळ

View All
advertisement