Pune Traffic : पुणेकरांनो घराबाहेर पडताय? जरा थांबा! शुक्रवारी हे 93 रस्ते 'ब्लॉक', प्रवासाआधी पाहा यादी
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा शुक्रवारी (२३ जानेवारी) पार पडणार आहे. या ७५ किलोमीटर लांबीच्या टप्प्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील तब्बल ९३ ठिकाणच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा शुक्रवारी (२३ जानेवारी) पार पडणार आहे. या ७५ किलोमीटर लांबीच्या टप्प्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील तब्बल ९३ ठिकाणच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. नागरिकांची सुरक्षितता आणि स्पर्धेचे यशस्वी आयोजन व्हावे, यासाठी पोलिसांनी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.
स्पर्धेचा मार्ग आणि वेळेचे नियोजन: हा टप्पा बाणेर येथील राधा चौकातून सकाळी सुरू होईल आणि शहरातील सूस रस्ता, पाषाण, पुणे विद्यापीठ चौक, सेनापती बापट रस्ता, कर्वे रस्ता, वनाज, नळस्टॉप, टिळक रस्ता, अप्पा बळवंत चौक आणि नेहरू रस्ता अशा प्रमुख भागांतून मार्गक्रमण करत बालगंधर्व चौक येथे पूर्ण होईल. हा टप्पा सुमारे ७५ किलोमीटरचा आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत विशेषतः राधा चौक ते पूनम बेकरी, पाषाण सर्कल, लॉ कॉलेज रस्ता आणि सातटोटी (सेवन लव्हज) चौक यांसारखे महत्त्वाचे रस्ते आवश्यकतेनुसार बंद ठेवले जातील.
advertisement
वाहतूक पोलिसांच्या सूचना: पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी संपूर्ण स्पर्धा मार्ग 'नो पार्किंग झोन' म्हणून घोषित केला आहे. बावधन, सांगवी, वाकड, निगडी, पिंपरी आणि चिखली या विभागांत येणाऱ्या मार्गांवर ९३ ठिकाणी बदल करण्यात आले आहेत. या कालावधीत पोलिसांनी केवळ आपत्कालीन वाहने आणि स्पर्धेशी संबंधित वाहनांनाच परवानगी दिली आहे. नागरिकांनी शुक्रवारी दिवसभर स्पर्धा मार्गाचा वापर टाळून प्रशासनाने दिलेल्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
advertisement
स्पर्धेचा मार्ग (Route):
राधा चौक (बाणेर) → पूनम बेकरी (सूस रस्ता) → पाषाण सर्कल → पुणे विद्यापीठ चौक → राजीव गांधी पूल → सेनापती बापट जंक्शन → सेनापती बापट रस्ता (बालभारती) → पत्रकार भवन → लॉ कॉलेज रस्ता → शेलार मामा चौक → कर्वे पुतळा चौक → वनाज → पौड रस्ता → नळस्टॉप → म्हात्रे पूल → सेनादत्त पोलीस चौकी → टिळक चौक → पुरम चौक → अप्पा बळवंत चौक → राष्ट्रभूषण चौक → सावरकर चौक → महाराष्ट्र मित्र मंडळ चौक → सेवन लव्हज चौक → पॉवर हाऊस चौक → डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक → इंदिरा गांधी चौक → अर्जुन रस्ता → घोरपडी जंक्शन → बोलहाई चौक → लाल महाल चौक → स. गो. बर्वे चौक → नरवीर तानाजी वाडी चौक → गरवारे चौक → बालगंधर्व चौक.
advertisement
बंद ठेवले जाणारे प्रमुख रस्ते (दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत):
राधा चौक ते पूनम बेकरी (बाणेर - सूस रस्ता)
पाषाण सर्कल ते राजीव गांधी पूल (विद्यापीठ रस्ता)
राजीव गांधी पूल ते सेनापती बापट जंक्शन
सेनापती बापट रस्ते ते बालभारती
लॉ कॉलेज रस्ता ते शेलार मामा चौक
कर्वे पुतळा चौक ते वनाज-पौड रस्ता
advertisement
नळस्टॉप ते सेनादत्त पोलीस चौकी
सेनादत्त चौक ते टिळक चौक
टिळक रस्ता ते बाजीराव रस्ता
अप्पा बळवंत चौक ते राष्ट्रभूषण चौक
राष्ट्रभूषण चौक ते सावरकर चौक
सावरकर चौक ते महाराष्ट्र मित्र मंडळ
महाराष्ट्र मित्र मंडळ ते सेवन लव्हज चौक
सेवन लव्हज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक (नेहरू रस्ता)
advertisement
घोरपडी जंक्शन परिसर
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 11:30 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic : पुणेकरांनो घराबाहेर पडताय? जरा थांबा! शुक्रवारी हे 93 रस्ते 'ब्लॉक', प्रवासाआधी पाहा यादी









