2016 Trend : सेलिब्रिटी का शेअर करतायेत 2016 सालातील फोटो; म्हणे, '2026 हे नवीन 2016', म्हणजे नेमकं काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
2016 Photo Trend : तुम्ही गेल्या काही दिवसांत इन्स्टाग्रामवर पाहिलं असेल तुम्हाला बहुतेक सेलिब्रिटींनी त्यांचे 2016 सालातील फोटो शेअर केले आहेत. 2016 सालातील फोटोचा हा ट्रेंड चांगलाच व्हायरल होतो आहे.
advertisement
advertisement
अभिनेत्री करिना कपूर, आलिया भट्ट, सोनम कपूर, अनन्या पांडे अशा कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांचे 2016 सालातील फोटो शेअर केलेले तुम्ही पाहिले असतील. 2016 वर्षात असं काय होते, त्या वर्षातील हे फोटो इतके खास का आहेत, 2016 सालातील फोटोंचा हा ट्रेंड नेमका काय आहे? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील.
advertisement
हा ट्रेंड म्हणजे 10 वर्षांपूर्वीचं डिजीटल युग. 2016 साली इन्स्टाग्रामवर आतासारखा दिखाऊ कंटेंट नव्हता, जास्त फिल्टर्स नव्हते. आजचं सोशल मीडिया इतकं क्युरेटेड आणि आर्टिफिशिअल बनलं आहे. प्रत्येक फोटो परफेक्ट असावा, त्यातील लाइट योग्य असावी, कॅप्शनचा खोल अर्थ असावा असं असतं. पण 2016 हा असा काळ होता जेव्हा लोक कोणत्याही दबावाशिवाय फोटो पोस्ट करायचे.
advertisement
advertisement
advertisement








