advertisement

लाईट..कॅमेरा..ॲक्शन! पुणे पोलिसांनी कोयता गँगला ऑन कॅमेरा ठोकून काढलं, पाहा VIDEO

Last Updated:

दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. पोलिसांनी टोळीला दहशत माजवल्याच्या ठिकाणी घेऊन जात ठोकून काढलं आहे.

News18
News18
मागील काही दिवसांपासून पुण्यासह आसपासच्या परिसरात गुन्हेगारीच्या विविध घटना उघडकीस येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात टोळीयुद्ध देखील भडकलं होतं. या टोळीयुद्धातून आंदेकर टोळीने आयुष कोमकर आणि गणेश काळेची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या केली. हत्येच्या या घटना घडल्यानंतर पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीच्या नांग्या ठेचल्या. सर्व आरोपींना अटक केली. आरोपींची धिंड काढत त्यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला.
तरीही पुण्यातील गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही. पुण्यातील हडपसर, फुरसुंगी, कोंढवा, कोथरुड आणि कात्रज परिसरात अनेक छोट्या मोठ्या गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत. हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न या टोळ्यांकडून केला जातोय. अशाच प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. पोलिसांनी टोळीला दहशत माजवल्याच्या ठिकाणी घेऊन जात ठोकून काढलं आहे.
advertisement
पोलिसांनी कोयता गँगमधील आरोपींना नागरिकांसमोर ऑन कॅमेरा फटके दिले आहेत. त्यांनी रस्त्याच्या बाजुला पडदा लावून एका एका आरोपीला पडद्याआड घेऊन जात लाकडी दांड्याने फडके दिले आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरं तर, पुण्यात विविध प्रकरणात गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी त्यांची धिंड अनेकदा काढली आहे. मात्र तरीही गुन्हेगार सुधरताना दिसत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी आता थेट नागरिकांसमोरच चोप देण्याचा पर्याय अवलंबला आहे. एवढंच नव्हे तर पोलिसांनी आरोपींना गुडघ्यावर देखील चालायला लावलं आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी फुरसुंगीच्या आदर्शनगर परिसरात २० ते २५ गाड्यांची तोडफोड केली होती. आरोपींनी हातात कोयते घेऊन गाड्या फोडल्या होत्या. यात चार चाकी वाहनं, रिक्षा आणि काही टूव्हिलरचा समावेश होता. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली. यानंतर त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी थेट नागरिकांसमोरच गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना चोप दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
लाईट..कॅमेरा..ॲक्शन! पुणे पोलिसांनी कोयता गँगला ऑन कॅमेरा ठोकून काढलं, पाहा VIDEO
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement