Pune News : निलेश घायवळचा गेम ओव्हर! पुणे पोलिसांची थेट UK मध्ये लावली फिल्डिंग

Last Updated:

Nilesh Ghaiwal Arrest In UK : पुणे पोलिसांकडून युके हाय कमिशनला पाठवण्यात आलेल्या या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, घायवळवर पुण्यातील अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Pune Police Pens to United Kingdom High Commission
Pune Police Pens to United Kingdom High Commission
Pune Police Letter To UK Police (अभिजीत पोटे, प्रतिनिधी) : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळला (Nilesh Ghaiwal) याला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी पळापळ केली होती. मात्र, घायवळ स्विझर्लँडला पळाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तो लंडनला गेल्याची माहिती देखील मिळाली होती. अशातच आता पुणे पोलिसांनी मोठं पाऊल उचललं असून निलेश घायवळला ताब्यात घेण्यासाठी थेट युके हाय कमिशनसोबत पत्रव्यवहार केला आहे.

पासपोर्ट चुकीच्या पद्धतीने बनवला

निलेश घायवळने पासपोर्ट चुकीच्या पद्धतीने बनवला असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. निलेश घायवळने फेक पासपोर्ट काढून पळ काढला आहे. त्यामुळे त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात यावं, अशी मागणी देखील करण्यात आलीये. पुणे पोलिसांचे हे पाऊल आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हेगारांना पकडण्यासाठी महत्त्वाचे मानलं जात आहे.
advertisement

घायवळचा खेळ खल्लास?

पुणे पोलिसांकडून युके हाय कमिशनला पाठवण्यात आलेल्या या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, घायवळवर पुण्यातील अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला शोधून काढावे आणि त्याच्याबद्दलची माहिती आम्हाला कळवावी, अशी विनंती पुणे पोलिसांनी युके हाय कमिशनकडे केली आहे. त्यामुळे आता घायवळचा खेळ खल्लास होणार का? असा सवाल विचारला जातोय.
advertisement

निलेश घायवळची आर्थिक नाकेबंदी

दरम्यान, बँक खाती गोठवून पोलिसांनी घायवळची आर्थिक नाकेबंदी केली. तर, दुसरीकडे पासपोर्ट रद्द करून आणखी एक दणका दिला. घायवळ टोळीवर पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे. निलेश घायवळ टोळीतला फरार आरोपी अमोल बंडगर भिगवण येथून ताब्यात घेतली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याआधी पोलिसांनी घायवळच्या पुण्यातील घरावर छापा टाकला होता. त्यानंतर त्याची बँक खाती गोठवली गेली होती.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : निलेश घायवळचा गेम ओव्हर! पुणे पोलिसांची थेट UK मध्ये लावली फिल्डिंग
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement