राजगडमध्ये मोठी दुर्घटना! ट्रेकिंगसाठी गेलेले 25 विद्यार्थी जखमी, कड्यामध्ये अडकलेल्या पोरांना गावकऱ्यांनी वाचवलं

Last Updated:

Rajgad Accident News : पुण्यातील एका खासगी साहसी ट्रेकिंग क्लासच्या माध्यमातून सुमारे 50 हून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक या ट्रेकसाठी आले होते. यामध्ये प्रामुख्याने 14 ते 17 वयोगटातील मुलांचा समावेश होता.

Pune Rajgad Accident Trekkers attacked by honeybees
Pune Rajgad Accident Trekkers attacked by honeybees
Rajgad Trekkers News : पुण्यातील वेल्हे तालुक्यातील निसर्गरम्य मढेघाट परिसरात ट्रेकिंगचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण ट्रेकिंगला येतात. अशातच शालेय विद्यार्थ्यांवर निसर्गाचा कोप झाल्याचं पहायला मिळालं. राजगड तालुक्याच्या मढेघाट भागात काल संध्याकाळी एका सहलीदरम्यान आग्या मोहोळाच्या मधमाशांनी अचानक भीषण हल्ला चढवला. या अनपेक्षित संकटामुळे मढेघाट ते उपंडा असा ट्रेक करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी पळापळ झाली. सुदैवाने, स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या अफाट धैर्यामुळे आणि तातडीने केलेल्या मदतीमुळे या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही.

आग्या मोहोळ मधमाशांचा अचानक हल्ला

पुण्यातील एका खासगी साहसी ट्रेकिंग क्लासच्या माध्यमातून सुमारे 50 हून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक या ट्रेकसाठी आले होते. यामध्ये प्रामुख्याने 14 ते 17 वयोगटातील मुलांचा समावेश होता. मढे घाट उतरल्यानंतर मध्यभागी असलेल्या गर्द झाडीतून जात असताना झाडावर असलेल्या आग्या मोहोळाच्या माशा उठल्या आणि त्यांनी थेट विद्यार्थ्यांवर हल्ला केला. मधमाशांच्या डंखापासून वाचण्यासाठी विद्यार्थी सैरभर झाले, मात्र या धावपळीत 35 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
advertisement

कड्यामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना वाचवलं

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 8 ते 10 विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जखमी झाले असून, इतर 25 जणांना मधमाशांनी शरीरावर ठिकठिकाणी चावा घेतला आहे. घटनेची माहिती मिळताच तोरण माची हॉटेलचे मालक अभिजीत भेके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केलं. यानंतर केळद गावचे माजी सरपंच रमेश शिंदे आणि इतर स्थानिकांनी कड्यामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
advertisement

2 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर

जखमी विद्यार्थ्यांना तातडीने 108 रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांमधून वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दंश झालेल्या ठिकाणी तीव्र वेदना होणे, चक्कर येणे, उलटी आणि चेहऱ्यावर प्रचंड सूज येणे अशी लक्षणे या विद्यार्थ्यांमध्ये दिसत होती. ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ज्ञानेश्वर हिरास आणि त्यांच्या टीमने तातडीने उपचार सुरू केले. अधिक गंभीर असलेल्या 2 विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असून, उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
राजगडमध्ये मोठी दुर्घटना! ट्रेकिंगसाठी गेलेले 25 विद्यार्थी जखमी, कड्यामध्ये अडकलेल्या पोरांना गावकऱ्यांनी वाचवलं
Next Article
advertisement
US Attack Venezuela Gold Price: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदाजाने गुंतवणूकदारांची झोप उडणार!
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदा
  • अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर हल्ला करत राष्ट्रपती मादुरो यांना अटक केली.

  • व्हेनेझुएला हा देश सर्वाधिक तेल उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक

  • अमेरिकेच्या हल्ल्याचे परिणाम बाजारावरही होणार असल्याचे संकेत

View All
advertisement