Vande Bharat Express : गुड न्यूज! पुणे ते नांदेडदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावणार; कुठे कुठे थांबणार?

Last Updated:

Pune To Nanded Vande Bharat : पुण्याहून नांदेडसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर पुणे–नांदेड प्रवास फक्त 7 तासांत पूर्ण होईल, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रवास अधिक सोयीस्कर होईल.

News18
News18
पुणे : एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रातील पुणे–नांदेड मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. पुणे तसेच नांदेडमधील रहिवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ खूप कमी होणार आहे. सध्या पुणे–नांदेड प्रवास पूर्ण करण्यास जास्त वेळ लागतो, पण वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर हा 550 किमीचा प्रवास फक्त 7 तासांत संपणार आहे.
या गाडीला सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक पावले उचलली आहेत. नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून पाठपुरावा केला होता. त्यांच्या भेटीनंतर रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावाची दखल घेतली असून डिसेंबरपर्यंत गाडी सुरू होण्याची शक्यता आहे.
असे असतील थांबे
वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर मराठवाडा आणि पुणे यांच्यातील प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होईल. ही गाडी नांदेड, लातूर आणि धाराशिव येथे थांबे घेईल. प्रवाशांसाठी सुविधा खूप उत्तम आहेत. ट्रेनमध्ये एसी चेअर कार, हाय-स्पीड वाय-फाय, आरामदायी सीट्स आणि प्रगत सुरक्षा व्यवस्था असेल.
advertisement
हे आहेत तिकीटांचे दर
तिकीटांचे दर देखील स्पष्ट झाले आहेत. चेअर कारमध्ये प्रवास करण्यासाठी भाडे 1500 ते 1900 रुपये असेल, तर एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये भाडे 2000 ते 2500 रुपये अपेक्षित आहे. प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळेल.
मंत्रालयाकडून गाडीचे वेळापत्रक आणि उद्घाटनाची तारीख दिवाळीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर पुणे–नांदेड प्रवास फक्त वेळेची बचत नाही तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील एकात्मिक विकासाला देखील चालना मिळेल. कृषी, उद्योग, शिक्षण आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये याचा फायदा होईल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Vande Bharat Express : गुड न्यूज! पुणे ते नांदेडदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावणार; कुठे कुठे थांबणार?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement