‘एकविरा आई तू डोंगरावरी…’ तरुणाने घरात साकारला असा देखावा की सगळे झाले अवाक्
- Published by:News18 Marathi
Last Updated:
स्वप्नील सावळे या तरुणाने एकविरा आईचा हुबेहूब देखावा सादर केला आहे.
पुणे, 20 ऑक्टोबर : शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र चैतन्य आणि भक्तिमय वातावरण आहे. घरोघरी देवीचे घट बसविले असून आणि अनेकांनी देवी पुढे विविध देखावे देखील सादर केले आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात दिवड येथे राहणाऱ्या स्वप्नील सावळे या तरुणाने आपल्या घरी लोणावळा येथील कार्लातील आई एकवीरा मंदिरातील गाभाऱ्याची प्रतिकृती असलेली आरास साकारली आहे. त्याच्या हा देखावा पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होत आहे.
कसा साकारला देखावा?
स्वप्नील सावळेने एकविरा आईचा हुबेहूब देखावा साकारला आहे. यामध्ये पायथा मंदिर, पाच पायरी मंदिर आहे आणि मुख्य देवीचा गाभारा देखील तयार केलेला पाहिला मिळतो. त्यामुळेच हा देखावा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
शादरदीय नवरात्रोत्सवात अंबाबाई गजारूढ, पाहा पंचमीला कशी आहे पूजा?
आमच्या घरामध्ये कार्ला निवासिनी एकविरा देवी ही 2009 पासून देवी विराजमान आहे. दरवर्षी नवरात्र उत्सव आम्ही मोठ्या थाटामाटात साजरा करतो. यावर्षी देवीच हुबेहूब प्रतिरूप देखावा सादर केला आहे म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ गोष्टींचा जास्त वापर यामध्ये तयार करण्यासाठी केला आहे. इथे असणारी कमान, पायथा मंदिर, पाच पायरी मंदिर, वरच मंदिर आणि लेणी हे सर्व बनवलं आहे. हे सर्व करण्यासाठी साधारण दीड महिन्याचा कालावधी लागला. यामध्ये माझे भाचे यांनी देखील मदत केली आणि पूर्ण देखावा तयार केला, असं स्वप्नील सावळे याने सांगितले.
advertisement
माया शक्तीची रूपे
एकविरा आई ही आगरी कोळी समाजाची कुलस्वामिनी मानली जाते. महाराष्ट्राच्या दऱ्या खोऱ्यात आदी माया शक्तीची रूपे आहेत. त्यातलंच ही एकविरा देवी आहे, अशी माहिती स्वप्निल सावळेने दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 20, 2023 11:48 AM IST